Satara Rain : साताऱ्यासह कराड, पाटणला पावसाने झोडपले; कर्नाटक, बीड, सोलापूर, विदर्भातून आलेल्या ऊसतोड मजुरांचे मोठे नुकसान

साताऱ्यासह कराड, पाटण तालुक्यात आज बुधवारी पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
Heavy Rain in Karad Patan
Heavy Rain in Karad Patanesakal
Updated on
Summary

पावसाचे वातावरण अजूनही कायम असल्याने ऊसतोडी एक-दोन दिवस बंद राहील, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कराड : साताऱ्यासह कराड, पाटण तालुक्यात (Heavy Rain in Karad Patan) आज बुधवारी पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामामधील सुरू असलेल्या पीक काढणीच्या कामात व्यत्य आला. दरम्यान, ऊस तोडीसाठी कर्नाटक, बीड, सोलापूर, विदर्भ, मराठवाड्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी जाऊन त्यांचे मोठे नुकसान झाले.

Heavy Rain in Karad Patan
Raju Shetti : शेतकऱ्यांची दिवाळी होणार नसेल, तर कारखानदारांचीही होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा रोखठोक इशारा

जीवनावश्यक वस्तूही भिजल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणचा निवारा शोधावा लागला. कराड आणि पाटण तालुक्यात रविवारी पहाटे झालेल्या पावसानंतर आज पहाटेच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भुईमूग, सोयाबीन, भात व अन्य पिकांची सुरू असलेल्या काढणीत व्यत्यय आला आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचून राहिल्याने काढणी ठप्प झाली आहे.

Heavy Rain in Karad Patan
Maratha Reservation : 'आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा'; मराठा समाज आक्रमक

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यामुळे कर्नाटक, बीड, सोलापूर, विदर्भ, मराठवाड्यातून ऊसतोड मजूर साखर कारखान्याच्या परिसरात व कराड-पाटण तालुक्यातील मोठ्या गावात दाखल झाले आहेत. ते राहत असलेल्या परिसरात पावसाचे पाणी साचून त्यांचे जीवनावश्यक वस्तूंसह कपडे, अन्नधान्य भिजले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे वातावरण अजूनही कायम असल्याने ऊसतोडी एक-दोन दिवस बंद राहील, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.