VIDEO पाहा : तौक्ते चक्रीवादळाची महाबळेश्वरला धडक; मुसळधार पावसात घरं, शाळांची पडझड

समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा महाबळेश्वर तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे.
Tauktae Cyclone
Tauktae Cycloneesakal
Updated on

महाबळेश्वर (सातारा) : समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) महाबळेश्वर तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे. गेली दोन दिवस वादळी वारे व मुसळधार पावसाने (Heavy Rain) तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या चक्री वादळांमुळे तालुक्यांतील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. चक्री वादळांमुळे महाबळेश्वर तालुक्यांत झाडे उन्मळून पडणे, घराचे छप्पर उडणे, अंगणवाडी शाळांचे इमारतींचे नुकसान, पाणी पुरवठा बंद पडणे, वीज गायब होणे, नदीनाल्यांना अचानक पूर येणे, गुरांचे गोठे, पाॅलिहाऊस, संरक्षक भिती पडणे अशा घटनांच्या मालिकांमुळे तालुक्यांतील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच ठिकाणी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी, कुणीकडे ही जीवित हानी झालेली नाही. (Heavy Rains In Mahabaleshwar Taluka Due To Tauktae Cyclone)

घराची मोठ्या प्रमाणात पडझड : तालुक्यांतील किल्ले प्रतापगड, राजपूरी, भेकवली, चिखली, देवळीमुरा, कोंढोशी येथे घरांचे छप्पर उडणे, भिंती कोसळल्या. चिखली गावातील अंगणवाडी शाळेची इमारत कोसळली तर, कासरूड येथील प्राथमिक शाळेचे नुकसान झाले आहे.

वीज गायब : मुसळधार पावसामुळे वीजवितरण कंपनीला मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात विजेचे खांब व विद्युत तारा पडल्यामुळे शनिवार रविवार सोमवार संपूर्ण तालूका अंधारात बुडाला आहे. शनिवार पासून वीज पुरवठा बंद आहे. खंडित झालेला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीजवितरण विभागाचे कर्मचारी तारेवरची कसरत करत आहेत तरी देखील सोमवारी रात्री पर्यंत वीज पुरवठा सुरू झालेला नव्हता.

पाणीपुरठ्यावर परिणाम : शनिवार पासून वीज गायब झाल्यामुळे त्याचा परिणाम महाबळेश्वर पाचगणी सह तालुक्यांतील विविध गावांतील पाणी पुरवठा योजनांवर झाला आहे. शनिवार पासून महाबळेश्वर पाचगणी सह अनेक गावांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. वीज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकणार नाही अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. महाबळेश्वर पालिकेने टॅंकर भरुन ठेवले असून मागणी केल्यास पुरवण्यासाठी तयारी करुन ठेवली आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे नदी नाले ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सोमवार दुपार नंतर पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी वादळी वारे काही कमी झाले नाही. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णालेक पाणीपातळीत वाढ झाली आहे. लिंगमळा धबधब्यावरून ही कोसळणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन मे महिन्यात लिंगमळा धबधब्या वरून कोसळणार जलप्रपाताचे दृश्य मोठे विलोभनीय दिसत आहे.

VIDEO पाहा : तौक्ते चक्रीवादळाचा कास, बामणोलीला तडाखा; महाबळेश्वरात 'मुसळधार'

Heavy Rains In Mahabaleshwar Taluka Due To Tauktae Cyclone

Tauktae Cyclone
माशाच्या गळाला लागला बाँम्ब; घटनास्थळी पोलिसांसह ATS दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()