सातारा : कोरोना संसर्गावरील उपचार करण्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जाताना कागदपत्रे बरोबर नेली जात नसल्यामुळे रुग्णांच्या उपचारांचा "क्लेम' करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे.
कोरोनाचा हॉरर शो
केशरी रेशन कार्डधारकांसाठी शासकीय किंवा खासगी दवाखान्यांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांसाठी शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित आहे. या योजनेमध्ये विविध प्रकारच्या 996 आजारांवर प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत मिळते. लाभार्थी कुटुंबातील एक किंवा अनेक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. सध्या कोरोना संसर्गाची बाधा देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शासनाने कोरोना संसर्गावरील उपचारही या योजनेच्या कक्षात आणले आहेत. शासनाने कोरोना उपचारासाठी नेमून दिलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गेलेल्या नागरिकाला ही सुविधा मिळते.
माणदेशीने अडवले 925 टीसीएम पाणी, आठ वर्षांत 17 सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी
जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये एकूण 27 रुग्णालयांची नोंदणी आहे. त्यामधील सध्या नऊ रुग्णालये ही कोरोना आणि नॉन कोरोना आजारांसाठी स्वतंत्रपणे उपचार देण्यासाठी निवडण्यात आली आहेत. कोरोना रुग्णांसाठी ही योजना केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी मर्यादित न ठेवता शासनाने पिवळी, अंत्योदय, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिकाधारकांनाही या रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रयोगशाळा, इमॅजिंग तपासण्या, आंतररुग्ण सेवा, रक्तघटक कन्झ्युमेबल, डिस्पोजेबल, शस्त्रक्रिया, गृहशुल्क, आहार, परतीचा प्रवास इत्यादी सुविधांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 1600 रुग्णांनी या रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत.
अपंगत्वावर केली मात, त्या कर्तबगाराला उदयनराजेंची साथ!
या मोफत उपचार योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित रुग्णाची शिधापत्रिका किंवा तहसीलदारांचा रहिवासी दाखला यापैकी एक तसेच अधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट होण्यापूर्वी संबंधित रुग्णाचा स्वॅब घेतला जातो. अहवाल येईपर्यंत तो रुग्ण कोरोना केअर सेंटरमध्ये असतो. त्या वेळी बहुतांश रुग्ण हे वरील कागदपत्रे सोबत आणत नसल्याचे आत्तापर्यंत समोर आले आहे. बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करून घेतले जाते तसेच घरातील व्यक्तींनाही क्वारंटाइन केले जाते. त्यामुळे संबंधित रुग्णाला उपचार कालावधीत वरील कागदपत्रे देणे शक्य होत नाही. परिणामी उपचाराची पूर्वपरवानगी मिळवून त्याला तातडीने योजनेच्या लाभात समाविष्ट करता येत नाही. त्यामुळे काही वेळा रुग्णांना लाभ मिळवून देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
चौपदरीकरणाच्या कामात गावांच्या नावाच बारस
आरोग्यमित्रांकडे कागदपत्रे द्या
कागदपत्रे नसल्यामुळे रुग्णांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात अडचणी येतात. त्यामुळे रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी दाखल होताना कागदपत्रे सोबत ठेवावीत किंवा त्यांचे मोबाईलमध्ये चांगले छायाचित्र काढून ठेवावे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथील आरोग्यमित्रांकडे संबंधित कागदपत्रे द्यावीत, असे आवाहन महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे देविदास बागल यांनी "सकाळ'शी बोलताना केले. तसेच अंतर्भूत रुग्णालयात काही अडचणी असल्यास नोडल ऑफिसरशी संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कासजवळ पुन्हा रस्ता खचण्याची भीती, अपघाताची शक्यता
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.