पुसेगाव (जि. सातारा) : कटगुण (ता. खटाव) येथील अमर गोरे यांच्या सुमारे 459 देशी पाळीव कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. ही माहिती समजल्यावर पशुवैद्यकीय पथकाने जलद गतीने कटगुण येथे जाऊन या घटनेची माहिती घेतली. मृत झालेल्या कोंबड्यांचा नमुना फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे.
कटगुण येथील अमर गोरे यांची खटाव रस्त्यालगत देशी कोंबड्यांची पोल्ट्री आहे. ही पोल्ट्री त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती. अचानक सर्व कोंबड्या मृत झाल्याने अमर गोरे यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. ही माहिती समजल्यावर पशुवैद्यकीय पथकाने जलद गतीने कटगुण येथे जाऊन या घटनेची माहिती घेतली. मृत झालेल्या कोंबड्यांचा नमुना फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे. लॅबचा अहवाल आल्याशिवाय कोंबड्यांच्या आकस्मिक मृत्यूचे कारण समजू शकत नाही.
एका वेळी 459 देशी कोंबड्या आकस्मिकपणे मृत्युमुखी पडल्याने बर्ड फ्लूसदृश आजाराने खटाव तालुक्यात प्रवेश केला की काय? अशी शंका येथील जनतेच्या मनात येत आहे.
कोकण- पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक कोकणद्वार पाडणार
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.