प्रशासन सतर्क : मरिआईचीवाडीत सापडल्या मृत कोंबड्या; नमुने तपासणीसाठी प्रयाेगशाळेत

प्रशासन सतर्क : मरिआईचीवाडीत सापडल्या मृत कोंबड्या; नमुने तपासणीसाठी प्रयाेगशाळेत
Updated on

सातारा : खंडाळा तालुक्यातील मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले असून मृत्युचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसल्याने कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) ता. खंडाळा येथील सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्रतिबंध नियंत्रण अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) ता. खंडाळा येथील 10 किलाे मीटर त्रिज्येतील (Radius) क्षेत्र सतर्क भाग म्हणून आदेशान्वये जाहीर केला आहे.
 
या आदेशानुसार प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये-जा करण्यसास मनाई करण्यात आली असून त्या ठिकाणची खासगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्यात यावीत. प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणास वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर दाेन टक्के सोडियम हायड्रोक्साई किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने (दाेन टक्के) निर्जंतुकीकरण करावे.

James Naismith Google Doodle आजच्या दिवशी बास्केटबॉलचा लागला हाेता शाेध, जाणून घ्या त्यामागची कथा

प्रभावित पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यासंबंधीतच्या सर्व नोंदी व्यवस्थित ठेवण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी. प्रभावित क्षेत्राच्या 10 कि.मी त्रिज्येतील परिसरात प्रभावित पक्ष्यांच्या आजारांचे निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत कुक्कु  पक्ष्यांची खरेदी, विक्रीची दुकाने, वाहतूक, बाजार व यात्रा, प्रदर्शन इ. बाबी बंद राहतील. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा, असेही आदेशात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले आहे.

गाव कारभा-यांच्या निवडीसाठी सातारा जिल्ह्यात मतदान सुरु; 19 हजार 467 कर्मचा-यांची फाैज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.