सातारा : कोविड बाधित रुग्णांचा (corona patient) पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडनी (oxygen bed) व्यापलेल्या टक्केवारीच्या निकषानुसार, जिल्हा अद्याप ही तिसऱ्या स्तरातच समाविष्ट आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यात लागू असलेले निर्बंध जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी कायम ठेवले आहेत. मात्र, लॉजिंगची सुविधा उपलब्ध असलेल्या हॉटेल व रेस्टाॅरंटला (Hotel and Restaurants) सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत ५० टक्के आसन क्षमतेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. (Hotel And Restaurants Will Have To Pay A Fine Of 10 Thousand For Violating The Corona Rules Satara Marathi News)
कोरोना पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडच्या निकषानुसार, जिल्ह्याचा अद्यापही तिसऱ्या टप्प्यातच समावेश होत आहे.
कोरोना पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडच्या निकषानुसार, जिल्ह्याचा अद्यापही तिसऱ्या टप्प्यातच समावेश होत आहे. अद्यापही कोरोना बाधितांचा आकडा आठशेच्या खाली आलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवले आहेत. या बाबतचे नवे आदेश आज जारी केले आहेत. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी रेस्टारंट, हॉटेल्सना काही सवलत लागू केली आहे. यामध्ये ज्यांच्याकडे लॉजिंगची व्यवस्था आहे अशा हॉटेल्स व रेस्टारंटना सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत ५० टक्के आसन क्षमतेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.
मात्र, येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना आठवडाभर दुपारी चार वाजेपर्यंत सेवा पुरविता येणार आहे. याबाबत कोरोना नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीस एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तर हॉटेल व्यवस्थापनास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. या कारवाई नंतरही नियमांचे उल्लंघन केल्यास महिनाभर बंद ठेवण्याची कार्यवाही केली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.
Hotel And Restaurants Will Have To Pay A Fine Of 10 Thousand For Violating The Corona Rules Satara Marathi News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.