Karad Crime : दारू प्यायला न दिल्यामुळं हॉटेलची तोडफोड; हल्लेखोरांनी दांडके, बाटल्यांनी केलं नुकसान

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
liquor
liquoresakal
Updated on
Summary

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी नकार देताच संबंधितांनी हॉटेलवर हल्ला केला. या वेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करत लाकडी दांडके, बाटल्यांनी हॉटेलची तोडफोड केली.

कऱ्हाड : दारू (liquor) न दिल्याचा राग मनात धरून जमावाने कऱ्हाड-विटा मार्गावरील सैदापूर-विद्यानगर (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीतील कृष्णा कॅनॉल जवळील हॉटेल हर्ष एक्झिक्युटिव्हवर हल्ला चढवला. जमावाने दगडफेक करत लाकडी दांडके, बाटल्यांनी हॉटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

काल रात्री ही घटना घडली असून, पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कृष्णा कॅनॉलजवळील हॉटेल हर्ष एक्झिक्युटिव्हमध्ये विद्यानगरमधीलच एक जण शनिवारी दुपारी गेला होता. त्या वेळी त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्याकडे दारूची उधारीवर मागणी केली.

liquor
Karnataka : 'या' दोन बड्या नेत्यांनी उडवली माजी पंतप्रधानांची झोप; आता पक्ष वाचवण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

त्या वेळी तेथील हॉटेल (Hotel) कर्मचाऱ्याने उधारीवर दारू देण्यास नकार दिला. त्यामुळे दुपारी त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर हॉटेलमधील काही जणांनी उधारीवर दारू मागणाऱ्या युवकाला मारहाण करून तेथून हाकलून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर संबंधित युवक रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुमारे पंधरा जणांचा जमाव घेऊन पुन्हा हॉटेल हर्ष एक्झिक्युटमध्ये गेला. तेथे त्याने पुन्हा उधारीवर दारू देण्याची मागणी केली.

liquor
Satara Crime : लग्नाला अवघे दोन दिवस असताना तरुणानं घेतला गळफास; टोकाचं पाऊल उचलल्यानं चर्चांना उधाण

मात्र, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी नकार देताच संबंधितांनी हॉटेलवर हल्ला केला. या वेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करत लाकडी दांडके, बाटल्यांनी हॉटेलची तोडफोड केली. यामध्ये हॉटेलच्या काचा फोडल्या असून, इतर साहित्यासह फलकाचेही नुकसान केले आहे. त्यानंतर जमाव तेथून पांगला.

liquor
Sharad Pawar : शरद पवारांच्या केसाला जरी धक्का लागला, तर..; जीवे मारण्याच्या धमकीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

हॉटेलवर जमावाने हल्ला केल्याची माहिती मिळताच गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजू डांगे, पोलिस उपनिरीक्षक चोरगे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे, तसेच हल्लेखोरांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.