नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या रानभाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच : कांचनमाला निंबाळकर

नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या रानभाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच : कांचनमाला निंबाळकर
Updated on

फलटण (जि. सातारा) : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजाळे (ता. फलटण) येथे `रानभाजी महोत्सव 2020'चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचा प्रारंभ जिल्हा परिषद सदस्या कांचनमाला निंबाळकर यांच्या हस्ते झाला. पावसाची रिपरिप सुरू झाली की, रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी रानभाज्यांचे उत्सवही साजरे केले जात आहेत. 

या महोत्सवात शेतातील अळू, कुर्डू, शेवगा, तांदुळजा, अंबाडा, केना, चिघळ, गुळवेल, करटोली, टाकाळा, बांबू, ढेसा, आगाडा, पाथरी, पानांचा ओवा अशा 17 विविध प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने प्रदर्शित करण्यात आले होते. काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात. कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. औषधी गुणधर्म उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या, त्यांचे मानवी जीवनातील महत्त्व व बाजारपेठ उपलब्ध होणे हा या रानभाज्या महोत्सव आयोजनामागचा मुख्य उद्देश असल्याचे तालुका कृषी अधिकारी रणसिंग यांनी सांगितले.

पावसाळा सुरु झाला की, बाजारात रान भाज्या दिसायला लागतात. विशेष म्हणजे या भाज्या कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. कोणतही खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या रानभाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच असते, असे जिल्हा परिषद सदस्या कांचनमाला निंबाळकर यांनी सांगितले. तसेच त्यांनी कृषी विभागामार्फत आयोजित रानभाजी महोत्सवाच्या उपक्रमाचे कौतुकही केले. 

यावेळी सरपंच मारुती मोहिते, संभाजी निंबाळकर, महेश निंबाळकर, महेश शेडगे, तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, मंडल कृषी अधिकारी अमोल सपकाळ, पूजा दुदुस्कर, शेतकरी निळकंठ धुमाळ, अमोल भोईटे, कृषी पर्यवेक्षक रवी बेलदार, दत्तात्रय एकळ, मल्हारी नाळे, कृषी सहायक सचिन जाधव, गौरव यादव, सोमनाथ पवार, तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन नेवसे, कृषी तंत्रज्ञान सहायक सूरज फुले, कृषिमित्र कमलाकर भोईटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवात सहभागी शेतकरी शिवाजी भोईटे, लालासाहेब भोईटे, मधुकर सोनवलकर, सचिन फडतरे, चंद्रकांत शेडगे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कृषी सहायक सचिन जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.