Lok Sabha Election 2024 : उमेदवार वाढल्यास निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागणार

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढल्यास निवडणुक आयोगाकडे मार्गदर्शन मागवुन पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती कऱ्हाड दक्षिणचे सहाय्यक निवडणुक अधिकारी अतुल म्हेत्रे व कऱ्हाड उत्तरचे सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
If the candidate increases guidance from Election Commission lok sabha election
If the candidate increases guidance from Election Commission lok sabha election Sakal
Updated on

कऱ्हाड ः लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढल्यास मतदान यंत्रावर ३८४ उमेदवारांचे मतदान घेता येते. मात्र तरीही उमेदवारांची संख्या वाढली तर निवडणुक आयोगाकडे मार्गदर्शन मागवुन पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती कऱ्हाड दक्षिणचे सहाय्यक निवडणुक अधिकारी अतुल म्हेत्रे व कऱ्हाड उत्तरचे सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

गावोगावच्या जत्रा-यात्रेच्या कार्यक्रमांना आचार संहितेचा फटका बसणार नाही. मात्र रिसरत परवानग्या घेवुन जत्रा-यात्रा, सण, उत्सव साजरे करावे लागतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येथील प्रांत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलीस अपाधिक्षक अमोल ठाकूर, तहसीलदार विजय पवार,

गटविकास अधिकारी प्रताप पाटील, मुख्याधिकारी शंकर खंदारे, निवडणुक शाखेचे युवराज पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी कऱ्हाड दक्षिण व कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघात प्रशासन सज्ज झाले असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

कऱ्हाड दक्षिणेत एकूण ३०९ तर उत्तरेत ३३८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यावर्षी प्रथमच दोन्ही मतदार संघातील पन्नास टक्के मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग होणार आहे. तसेच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी साक्षरता क्लबची निर्मिती केली आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या परवानग्यांसाठी एक खिडकी सुविधा सुरू केली आहे.

मराठा समाजाचे उमेदवार वाढल्यास काय उपययोजना करणार यावर श्री म्हेत्रे म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे किती अर्ज दाखल होणार यावर पुढील दिशा ठरवण्यात येईल. मतदान यंत्रावर ३८४ उमेदवारांचे मतदान घेता येते.

मात्र तरीही उमेदवारांची संख्या वाढली तर निवडणुक आयोगाकडे मार्गदर्शन मागवुन पुढील कार्यवाही केली जाईल. गावोगावच्या जत्रा यात्रा, सण-उत्सव हे नियमीतपणे करता येतील. आचारसंहिता आहे म्हणून त्या बंद कराव्या असा त्याचा अर्थ नाही. मात्र त्यासाठी रितसर परवानग्या घेवुनच वेळेच्या बंधनात त्याचे कार्यक्रम करता येतील.

मतदारांसाठी मंडपाची व्यवस्था

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यात मतदानच सात मे रोजी होणार आहे. त्यावेळी मतदानासाठी आलेल्या मतदारांसाठी मतदान केंद्रावर पाणी, आरोग्य, लाईट आणि आवश्यक त्या सुविधा करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कऱ्हाड उत्तर व दक्षिण मतदार संघातील ज्या ठिकाणी उन्हापासून बचावासाठीची सोय नाही तेथे मंडपाची व्यवस्था करण्यात येईल असेही श्री. म्हेत्रे, श्री, चव्हाण यांनी स्पष्ट केले.

पोलिस रेकॉर्डवरील गुंडावर कारवाई

मतदारांना कोणताही त्रास होणार नाही याअनुशंघाने पोलिस रेकॉर्डवरील जे गुंड आहेत त्यांच्यावर कारवाईची मोहिम पोलिस अधिक्षक समिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आल्याचे सांगुण पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर म्हणाले, निवडणुक काळात अचानक कोंबीन ऑपरेशन, सराईत गुन्हेगारांची अचानक तपासणी, तडीपार गुंडाची तपासणी, अवैध दारु वाहतुक व विक्री यावर कारवाई, शस्त्रास्त्र तपासणी, मोक्काअंतर्गत कारवाई याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.