महाबळेश्‍वरात आढळलेल्या 'निपाह'वर सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया

Nipah Virus
Nipah Virusesakal
Updated on

सातारा : महाबळेश्‍वर येथील वटवाघळांमध्ये निपाह रोगाचे (Nipah Virus) विषाणू आढळल्याचा अहवाल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (Indian Institute Of Virology) वतीने देण्यात आला आहे. मात्र, या विषाणूचे माणसाच्या शरीरात संक्रमण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे, नागरिकांनी घाबरुन न जाता झाडाखालील पक्षांनी खाल्लेली फळे खाणे टाळावे, असे आवाहन आज जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी केले. (Important Appeal Of District Collector Shekhar Singh To The Citizens On Nipah Virus Satara Marathi News)

Summary

महाबळेश्‍वर येथील वटवाघळांमध्ये निपाह रोगाचे विषाणू आढळल्याचा अहवाल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या वतीने देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेखर सिंह यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus), मेडिकल कॉलेजची (Medical College) प्रक्रिया, निपाह रोगाचे विषाणू, कोरोना चाचणी आदीविषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये (Health Officer Dr. Aniruddha Athalye) उपस्थित होते. सिंह पुढे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात नियंत्रणात आला असून जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर ६.६९ टक्के आला आहे. तसेच जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचे आत्तापर्यंत 143 रुग्ण, तर 26 मृत्यू झाले आहेत. याशिवाय कोरोनाचा डेल्टा संक्रमणातील कोणताही रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळलेला नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढा जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय-योजनांचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Nipah Virus
राज्यात 'निपाह', महाबळेश्वरमध्ये वटवाघळात आढळला विषाणू

शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना शेखर सिंह म्हणाले, राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोगाच्या तपासणी दौऱ्यासाठी पर्याप्त पायाभूत सुविधा व पदभरती यांची तांत्रिक प्रक्रिया राबविली जात आहे. सातारा सिव्हिल हॉस्पिटलची मुख्य इमारत व जंबो हॉस्पिटलचा विस्तारीत भाग मेडिकल कॉलेजसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. पुणे, मिरज, सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहयोगी प्राध्यापकांना नेमणूक देण्यात येणार असून साताऱ्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांकडूनही विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. पानमळेवाडी येथे भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या इमारतीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग, प्रात्यक्षिक वर्ग, वसतीगृह, ग्रंथालय यांचे विकसन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Important Appeal Of District Collector Shekhar Singh To The Citizens On Nipah Virus Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()