Satara News : भाजप नेत्याच्या 'या' मागणीला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा 'ग्रीन सिग्नल'

पुरवणी मागण्यांत कऱ्हाड दक्षिणसाठी ३४ कोटी २५ लाखांचा निधी मंजुर
in nagpur winter session govt approves funding of 34 cr for developing satara atul bhosale
in nagpur winter session govt approves funding of 34 cr for developing satara atul bhosale Sakal
Updated on

Satara News : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सरकारने पुरवणी अर्थसंकल्पात कऱ्हाड दक्षिणमधील विकास कामांना ३४ कोटी २५ लाखांचा निधी मंजुर झाला आहे. भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण व महायुती सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे.

कऱ्हाड दक्षिणमधील विविध कामांसाठी निधी मंजुर करावा, यासाठी श्री. भोसले सातत्याने प्रयत्नशील होते. त्यानुसार त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार करुन, या कामांना मंजुरी मिळावी अशी विनंती केली होती.

या मागणीची दखल घेत आज थेट राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करुन, या विकासकामांसाठी भरीव निधीचीही तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या विकास कामांमध्ये घारेवाडी ते पोतले दरम्यान नवीन पुल बांधणे,

in nagpur winter session govt approves funding of 34 cr for developing satara atul bhosale
Satara News : खासगी एजंटांकडून एसटी प्रवाशांची पळवापळवी

विंग जोडरस्ता सुधारणा करणे, शेणोली स्टेशन ते शेरे थोरात मळा रस्ता सुधारणा करणे, वाठार म्हसोबा मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग दरम्यानचा रस्ता सुधारणा करणे, काले रस्ता सुधारणा करणे, चपनेमळा रस्ता सुधारणा करणे,

वडगाव हवेली ते चव्हाण मळा ते भवानी मंदीर ते वाघ डबरा रस्ता सुधारणा करणे, कासारशिरंबेतील रस्ता, आगाशिवनगर रस्ता, खोडशी ते सैदापुर रस्ता, ओगलेवाडी बाबरमाची ते गोवारे रस्ता, चचेगाव येरवळे पोतले कोळे पाणंद रस्ता,

in nagpur winter session govt approves funding of 34 cr for developing satara atul bhosale
Pune-Satara Highway : पुणे-सातारा महामार्गावरुन प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा..; वाहतुकीत केलाय बदल

वाठार ते कालवडे रस्ता, दुशेरे ते विकास पाणंद रस्ता, खुबी कृष्णा कॅनॉल ते कारखाना रस्ता, काळुबाई पाणंद रस्ता, रेठरे खुर्द ते वेताळबा पाणंद रस्ता, वनवासमाची ते महामार्ग रस्ता, सावंत मळा रस्ता, रेठरे बुद्रुक रस्ता, नांदगांव ते पवारवाडी रस्ता,

बोत्रेवाडी ते शेवाळवाडी जिंती रस्ता, कुसुर तारूख बामणवाडी वानरवाडी चाळकेवाडी रस्ता, धानाई मंदिर गोपाळनगर शिंदेवस्ती मोळाचा मळा ते वडगांव हवेली रस्ता यंचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.