सातारा जिल्ह्यातील भूस्खलनाच्या सावटाखाली 50 गावे

file
file
Updated on
Summary

जिल्ह्यातील पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर तालुक्यांतील तब्बल ५० गावांना भूस्खलनाचा धोका आहे, अशा गावांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

सातारा: जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या असून, वाई व पाटण तालुक्यांत झालेल्या नुकसानीतून बोध घेऊन जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एक हजार ३२४ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण केले आहे, तर ५० घरांना धोका असल्याने या घरांतील कुटुंबांनाही सुरक्षितस्थळी हलवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर तालुक्यांतील तब्बल ५० गावांना भूस्खलनाचा धोका आहे, अशा गावांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

file
पुणे, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज तर सातारा, रत्नगिरीला रेड अलर्ट

जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडवून दिली आहे. पश्चिमेकडील पाटण, कऱ्हाड, वाई, महाबळेश्वर व जावळी तालुक्यांमध्ये रस्ते खचण्यासोबतच भूस्खलनामुळे अनेक गावांतील घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. या गाडलेल्या घरांतील माती बाजूला करून आतमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर एनडीआरएफसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाने सुरू केले आहे, तर धोकादायक परिस्थिती असलेल्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, आणखी काही गावे या दोन- तीन तालुक्यांत आहेत. तेथे भूस्खलनाचा धोका आहे.

file
Rain Update : सातारा, महाबळेश्वर, पाटणात मुसळधार

सर्वाधिक धोका महाबळेश्वर, वाई, पाटण व जावळी तालुक्यातील काही गावांना आहे. आतापर्यंत भूस्खलन व पुराचा धोका असलेल्या तब्बल एक हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यामध्ये साडेचार हजार लोकांचा समावेश आहे, तसेच आणखी ५० घरांना भूस्खलनाचा धोका आहे. यामध्ये महाबळेश्वर, वाई तालुक्यातील गावांचा समावेश आहे. अशा कुटुंबांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.

file
'जरंडेश्वर'नंतर सातारा जिल्हा बँकेला ED ची नोटीस

महाबळेश्वर, वाई, पाटण तालुक्यांतील आणखी ५० गावांना भूस्खलनाचा धोका असून, या गावांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त असून, मागील काही वर्षांपूर्वी भिलारजवळ भूस्खलन झाले होते. त्या वेळी महाबळेश्वर तालुक्यातील काही गावांचे स्थलांतरण होणार होते. मात्र, अद्याप हे काम जिल्हा प्रशासनास जमलेले नाही. आणखी किती लोकांचा जीव गेल्यावर प्रशासन धोकादायक गावांतील कुटुंबांचे पुनर्वसन करणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

file
सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड चौकातील शीतल हॉटेलला आग

लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे

महाबळेश्वर, वाई व पाटण तालुक्यांतील दुर्गम भागात असलेल्या वाड्यांवर भूस्खलनाचा धोका असून, या गावांचा सर्व्हे करून खरोखरच धोकादायक असलेल्या घरांचे दुसरीकडे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यामुळे या तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाकडून केवळ कागदी घोडेच नाचविले जातात. त्यामुळे असे भूस्खलनात लोकांना जीव गमवावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.