चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलवर आयकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे.
कोरेगाव : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलवर (Jarandeshwar Sugar Mill) आयकर विभागाने छापेमारी (Income Tax Department) केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, तीन दिवस कारखाना बंद ठेवण्यात आल्याचे सुरक्षारक्षकांकडून सांगण्यात आले. मात्र, त्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सातच्या सुमारास चार वाहनांतून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकारी, पोलिसांनी कारखान्यात प्रवेश करून कारवाई सुरू केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कालच जरंडेश्वर कारखान्यावर येऊन 'जरंडेश्वर'चा मालक कोण? या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावे, अशा शब्दांत आव्हान दिले होते.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे, आज (गुरुवार) ही कारवाई सुरू आहे. दरम्यान, कारखान्याचे गेट बंद असून, आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. कारखान्याचे सुरक्षा रक्षक गेटच्या बाहेर मुख्य रस्त्यावर थांबले असून, ते गेटजवळ कोणालाही येऊ देत नाहीत. दरम्यान, दुपारी एका शासकीय वाहनातून सीआयडीचे अधिकारी कारखाना स्थळावर आले, परंतु, त्यांनाही कारखान्यामध्ये प्रवेश मिळू न शकल्याने ते माघारी फिरले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.