'भाजप नेत्याचं ऐकून 'जरंडेश्वर'वर धाड; Income Tax चं हे वागणं बरं नव्हं'

Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Updated on
Summary

चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

सातारा : आयकर विभागानं (Income Tax Department) आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापेमारी केली. त्यामुळे राज्यभरात गदारोळ माजला. यावर गृहराज्यमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर केलीय. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, जाणीवपूर्वक भाजपचा एक माजी खासदार येतो आणि दोन दिवसातच आयकर विभागाचे अधिकारी कारवाईसाठी येतात, याचा अर्थ यामध्ये संशय घेण्यासारखा आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने काही बाबी सांगितल्या, तर आयकर विभागाचे अधिकारी कसे लगेच येतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आतापर्यंत हे अधिकारी का आले नाहीत? असं परखड मतही त्यांनी व्यक्त केलं.

Shambhuraj Desai
24 घोटाळे उघड, त्यात ठाकरे सरकारमधील 18 नेत्यांची नावं : सोमय्या

देसाई पुढे म्हणाले, जे कोणी कारखानदार आहेत, त्यांची कोणत्याही चौकशाला सामोरे जाण्याची तयारी आहे. मात्र, भाजपकडून खोटे पुरावे सादर केले जात आहेत. ज्यांनी स्वच्छ कारभार केलाय, त्यांच्याकडून काहीही निष्पन्न झालेलं नाही. यापूर्वी देखील आपण असे आरोप पाहिलेत. किती तरी तपासण्याही झाल्या. मात्र, हाती काहीच लागली नाही. केंद्राच्या सत्ताधारी यंत्रणेचा वापर करुन महाविकास आघाडीतील नेत्यांवर खोटे आरोप केले जात आहेत. किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) याबाबतचे खरे पुरावे सादर करावेत, त्यांनी उगाच स्टंटबाजी करुन सरकारी यंत्रणेचा वेळ वाया घालवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. दत्त मंदिर, पंचमुखी गणेश मंदिर व साईबाबा मंदिरात भेट देवून तेथील व्यवस्थेची त्यांनी पहाणी केली, त्यावेळी देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला.

Shambhuraj Desai
जरंडेश्वर कारखान्यावर Income Tax ची धाड; CID चे अधिकारी फिरले माघारी

शासनाने आजपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी खुली केली आहेत. नागरिकांनी धार्मिक व प्रार्थनास्थळांना भेट देत असताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच भेट द्यावी. तसेच धार्मिक स्थळांना भेटी देत असताना नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता ठेवावी, असे आवाहनही देसाई यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.