साताऱ्यातील पाण्याची चिंता मिटली

कासच्या पातळीत वाढ; जुने धरण भरले, नवीनमध्ये वाढ
 Increase in water level of Kas Lake supplies water to Satara city
Increase in water level of Kas Lake supplies water to Satara city
Updated on

कास - गेल्या दहा दिवसांपासून कास, बामणोली परिसरात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत असून जुने ब्रिटिशकालीन धरण भरले आहे. पाण्याची नव्या साठवण पातळीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे यंदा सातारकरांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊन पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे.

जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून या परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने शेतकरीही सुखावला आहे. ओढे, नाले दुथडी भरून वाहत असल्याने कोयना, उरमोडी, कण्हेर, तारळी या नद्यांच्या व कास तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सातारा शहराला मुबलक पाणीसाठा होण्यासाठी कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून प्रगतिपथावर आहे.

धरणाच्या भिंतीचे व सांडव्याचे काही अपवाद तुरळक काम वगळता ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. धरणात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होणार आहे. मुसळधार पावसामुळे तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. जुनी २० फूट उंचीची पातळी पूर्ण होऊन पाणीपातळी २४ फुटांवर पोचली आहे. यंदा ४० फूट उंचीपर्यंत पाणी साठवले जाणार असून १६ फूट पाणीपातळी अद्याप भरण्यास शिल्लक आहे. पुढील आठ-दहा दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून नवीन सांडव्यातून पाणी वाहणार आहे. त्यामुळे यंदा सातारकरांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.