देशाच्या स्वातंत्र्यासाठीचा १८५७ चा उठाव अनेक अंगांनी महत्त्वाचा आहे. या संघर्षातील महत्त्वाचे नाव म्हणजे रंगो बापूजी गुप्ते.
-स्वप्नील शिंदे
सातारा : अंदमान (Andaman) हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे बलिदान स्थळ मानले जाते. ब्रिटिश सरकारविरोधात उठाव करणाऱ्या क्रांतिकारकांची रवानगी अंदमान तुरुंगामध्ये केली जात असे. या सहभागी कैद्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) यांच्यासह हजारो क्रांतिकारकांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तत्पूर्वी १८५७ चा उठावमध्ये सहभागी असलेल्या सातारा जिल्ह्यातील चार क्रांतिकारकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती.