कऱ्हाड - बदलापूर, कोल्हापूर, कोलकातासह अन्य महिलांच्या अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे आज शनिवारी तोंडाला काळ्या पट्या लावून निदर्शने करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार आज महाविकास आघाडीचे एकत्रित निदर्शने होतील असे चित्र होते.