Indian Army : 11 महिन्याच्या बाळाचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच जवान सूरज यादव यांचं निधन, गावावर शोककळा

सूरज यादव २००७-०८ दरम्यान भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. काही वर्षे त्‍यांनी पुण्यात सेवा बजावली.
Indian Army Jawan Suraj Yadav Dies
Indian Army Jawan Suraj Yadav Diesesakal
Updated on
Summary

सूरज हे एकुलता एक मुलगा अतिशय शांत संयमी आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. घरच्या सैनिकी परंपरेमुळे तेही भरती झाले होते.

विंग : धिमापूर (आसाम) याठिकाणी सैन्यदलात (Indian Army) सेवा बजावत असताना येरवळे (ता. कऱ्हाड) येथील सूरज मधुकर यादव (Suraj Yadav) या जवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ते अवघ्या ३२ वर्षांचे होते.

सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेची माहिती रात्री उशिरा गावाकडे समजताच गावातील वातावरण सुन्न झाले आहे. ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पार्थिव विमानाने आज (बुधवारी) पुण्यात त्यानंतर गावाकडे येणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजले.

Indian Army Jawan Suraj Yadav Dies
Sangli : भाजपला चितपट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा ठरणार निर्णायक; काँग्रेस करणार भव्य शक्तिप्रदर्शन

याबाबत ग्रामस्थ व नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी, सूरज यादव २००७-०८ दरम्यान भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. काही वर्षे त्‍यांनी पुण्यात सेवा बजावली. तद्नंतर तीन महिने बरेली (उत्तर प्रदेश) येथून पुढे नागालँड (आसाम) याठिकाणी १११ इंजिनिअर रेंजमेंट विभागात ते कार्यरत होते. सध्या धिमापूर याठिकाणी सेवा बजावत असताना त्‍यांना हृदयविकाराचा धक्‍का आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना सोमवारी सायंकाळी उशिरा घडली. दूरध्वनीवरून रात्री अकराच्या सुमारास गावाकडे ही माहिती मिळाली. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. गावातील वातावरण सुन्न झाले असून, आज दिवसभर नातेवाईक घरी येऊन माहिती घेत होते. यादव कुटुंबात एकूण दहा ते बारा जण आजी-माजी सैनिक आहेत.

Indian Army Jawan Suraj Yadav Dies
Satara Politics : आम्हाला बेअक्कल म्हणता, मग लोकसभेला का पडलात? शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर निशाणा

त्यापैकी सेवानिवृत्त मधुकर यादव यांचे सूरज हे एकुलता एक मुलगा अतिशय शांत संयमी आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. घरच्या सैनिकी परंपरेमुळे तेही भरती झाले होते. गणेश जयंतीला तीन महिन्‍यांपूर्वी ते गावी आले होते. दोन वर्षांनी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मृत्यूने गाव व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पार्थिव विमानाने आज पुण्यात तेथून गावाकडे येईल, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

Indian Army Jawan Suraj Yadav Dies
Udayanaraje Bhosale : 'माझ्यात आणि देसाईंमध्ये जुंपून देण्याचं काम, स्वत:चा उदो उदो करून घेणारा मी नाही'

चिमुकल्‍या कृष्‍णांशचे बाबा हरवले...

२०१६ दरम्यान सूरज यांचा विवाह झाला होता. त्‍यांना ११ महिन्यांचे बाळ आहे. सात ते आठ वर्षांनी बाळाचा जन्म झाल्‍याने कुटुंबीय आनंदात होते. पुढच्याच महिन्यात बाळाचा पहिला वाढदिवस करण्यासाठी सूरज सुटीवर येणार होते. तत्पूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्‍यांचा मृत्यू झाला. चिमुकल्या कृष्णांशचे बाबा हरवल्याने नातेवाईक व ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.