Indian Currency : दहा रुपयांचे नाणे वैध की अवैध? जनतेत संभ्रम, जिल्‍हाधिकारी देणार का सूचना?

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये काही विक्रेते व नागरिक दहा रुपयांची नाणी स्वीकारत नाहीत.
Ten Rupee Coin
Ten Rupee Coinesakal
Updated on
Summary

दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा असल्याने अनेकदा ग्राहक ती स्वीकारण्यास नकार देतात.

फलटण शहर : सध्‍या चलनात असलेले दहा रुपयांचे नाणे (Ten Rupee Coin) बंद झाले असल्‍याच्‍या गैरसमजातून ते स्वीकारण्यास ठिकठिकाणी नकार देण्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यासह फलटण तालुक्यात आहे. वास्तविक वैध चलनी नाणे नाकारणे हा गंभीर गुन्हा आहे, तरीही काही विक्रेते सामान्‍यांकडून दहा रुपयांची नाणी स्वीकारत नसल्‍याचे प्रकार घडत आहेत.

त्‍यावरून अनेकदा वादाचे प्रसंग घडत असताना दहा रुपयांचे नाणे वैध, की अवैध हा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये काही विक्रेते व नागरिक दहा रुपयांची नाणी स्वीकारत नाहीत. ही नाणी चलनामधून बंद झाली आहेत, अशी अफवा वजा मानसिकता त्यास कारणीभूत आहे. त्यातच काही बँका व संस्थाही मोठ्या प्रमाणात ही नाणी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे वैध असूनही अवैध असल्यासारखी सध्या दहा रुपयांच्या नाण्यांची अवस्था आहे.

Ten Rupee Coin
Kolhapur : तब्बल पाच हजारांहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची महामार्गावरच पडली पंगत; राजू शेट्टींनीही घेतलं पंगतीत बसून जेवण

जिल्‍हाधिकारी सूचना देणार का?

सातारा जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकांनी त्यांच्या शाखेत दर्शनी भागात याबाबतचे फलक लावावेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत व बँकांनीही त्याची प्राधान्याने अंमलबजावणी केली, तर नागरिक व व्यावसायिकांमध्ये असलेला गैरसमज दूर होईल, असेही तज्‍ज्ञांकडून सांगितले जात आहे.

Ten Rupee Coin
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाच्या पाणीवापरात कपात; वीजनिर्मितीचं पाणीही थांबवण्याचा 'जलसंपदा'चा निर्णय

...तर तीन वर्षांचा कारावास

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार चलनातील वैध नाणे स्वीकारण्यास कोण नकार देत असल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. नाणे नाकारण्याचे कारण लेखी घ्यावे. नाणी नाकारणाऱ्यावर कलम १२४ अन्वये राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. नाणे न स्वीकारणाऱ्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होतो व तो सिद्ध झाल्यास संबंधितास दंडासह तीन वर्षांचा कारावास देखील होऊ शकतो.

दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा असल्याने अनेकदा ग्राहक ती स्वीकारण्यास नकार देतात; परंतु आम्ही ती स्वीकारतो, असे सांगितले तर ग्राहकही ती स्वीकारतात. काही जण मात्र ठाम नकार देतात. त्यामुळे याबाबत सर्वांनाच वस्तुस्थिती समजणे महत्त्‍वाचे आहे.

- मनीष अग्रवाल, व्यावसायिक, फलटण

दहा रुपयांच्या फाटक्या नोटांचे प्रमाण अधिक असल्याने सध्या दहा रुपयांची नाणी बाजारात मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकदा बाजारात, मंडईत दहाची नाणी स्वीकारण्यास बंद झाल्याचे कारण देत नकार दिला जातो. याबाबत जागृती होणे आवश्‍‍यक आहे.

- कृष्णात बोबडे, फलटण

Ten Rupee Coin
Satara News : जटांसोबत सुटला 'ती'च्या अंधश्रद्धेचाही गुंता; दोन दशकांत 127 महिलांना केलं जटामुक्त

दहा रुपयाच्‍या नाण्‍याबाबत...

  • विशेष करून ग्रामीण भागात ही नाणी न स्वीकारण्याचे प्रमाण जास्त आहे.

  • या नाण्यांच्या देवाण- घेवाणीवरून अनेक ठिकाणी तू तू- मै मै होत आहे.

  • वास्तविक दहाचे नाणे बंद झाल्याबाबत रिझर्व्ह बँकेचे कुठलेही अधिकृत पत्र नाही.

  • नागरिकांनी नाणी बँकेत भरणे व बँकांनी ती व्यापाऱ्यांना देणे असे चक्र.

  • नाणी कोणी स्वीकारत नसल्याने व्यापाऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.