'लोकसभा निवडणुकीपूर्वी मी व्यक्तिगत, माझ्या आई-वडिलांविषयी बोललेलं मला सहन होणार नाही, मी एक वेळ राजकारण सोडेन.'
फलटण शहर : माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर व त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. त्या दहशतीला, भाजपने सत्तेतून साथ देऊ नये, हीच खरी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. ही बाब मी अजित पवार यांच्याही कानावर घालणार आहे, त्यानंतरही हे असेच सुरू राहिले, तर तुतारी वाजवायला कितीसा वेळ लागणार आहे, अशा थेट शब्दांत आमदार रामराजे नाईक-निंबाळकर (MLA Ramraje Naik-Nimbalkar) यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.