‘इनोव्‍हेटिव्‍ह सातारा’ची मुदत निवडणुकीपुरतीच

शिवेंद्रसिंहराजेंची उदयनराजेंवर टीका; पराभवाच्‍या भीतीने आकडेवारीचा पाऊस
Shivendra singh raje and  Udayan Raje Bhosle
Shivendra singh raje and Udayan Raje Bhoslesakal
Updated on

सातारा : पाच वर्षे संधी देऊनही सत्ताधाऱ्यांना साताऱ्याचा विकास करता आला नाही. आता निवडणूक जवळ आल्‍याने आकडेवारीचा पाऊस पाडत नवीन योजनांची घोषणा पराभवाच्‍या भीतीने करण्‍यात येत असून ‘इनोव्‍हेटिव्‍ह सातारा’ ‘हा सातारा, तो सातारा’ असे सांगत सातारकरांची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. जाहीर केलेल्‍या ‘इनोव्‍हेटिव्‍ह सातारा’ची मुदत निवडणुकीपुरतीच असल्‍याचे सांगत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्‍यावर टीका केली.

शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ‘‘सातारा विकास आघाडीचा कारभार गेली पाच वर्षे सातारकरांनी पाहिला आहे. पराभव होण्‍याची भीती दिसत असल्‍याने आकडेवारीचा पाऊस पाडण्‍यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. निवडणुकीच्‍या तोंडावर साताऱ्याच्‍या विकासासाठी अब्‍जावधी रुपये येत आहेत. ते रुपये सातारकर पेपरमध्‍ये पाहात असून निवडणूक झाली ते पुन्‍हा जातील. आम्‍ही आरोप करण्याऐवजी त्‍यांचेच नगरसेवक एकमेकांवर आरोप करत आहेत. कुणी किती खाल्‍ले, कुठल्‍या पदाधिकाऱ्याने किती घेतले, घंटागाड्यांत किती पैसे घेतले, कचराडेपोच्‍या कामात किती पैसे खाल्‍ले, असे आरोप त्‍यांच्‍यात अंतर्गत सुरू असून गेल्‍या पाच वर्षांत सातारा विकास आघाडीने सातारा पालिकेला भ्रष्‍टाचाराचे कुरण बनवले आहे.’’

पराभव दिसत असल्‍याने सातारा विकास आघाडीकडून बैठक झाल्‍याचा अप्रचार करण्‍यात येत आहे. सातारकरांनी आगामी काळात अशा अपप्रचाराला बळी न पडता विकासात्‍मक काम करणाऱ्यांच्‍या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. निवडणुकांमुळे सध्‍या फोटोसेशन सुरू असून त्‍यासाठीच ‘इनोव्‍हेटिव्‍ह सातारा’ उभारण्‍यात आले आहे. त्याची मुदत चार महिनेच राहणार असून निवडणूक झाली की ‘इनोव्‍हेटिव्‍ह सातारा’ गुंडाळून ठेवत ते पुन्‍हा पुढच्‍या निवडणुकीवेळीच उघडण्‍यात येईल, अशी टीकाही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

उदयनराजेंची घेतली फिरकी

उदयनराजेंकडून ‘व्हॅलेंटाइन डे’चा शुभेच्छा देणारा मेसेज तुम्हाला आला आहे का, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘उदयनराजे नेहमी मला त्यांच्या ड्रायव्हरच्या मोबाईलवरून फोन करतात. माझ्याकडे ड्रायव्हरचाही नंबर नाही. त्यामुळे मला त्याचा नंबर घेऊन त्यांच्या ड्रायव्हरला ‘आय लव्ह यू’चा मेसेज पाठवावा लागेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.