जयकुमार गोरे हे 'माण'साठी ऑक्‍सिजनच : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

माण-खटाव मतदारसंघात कोरोना बाधितांची संख्या वाढताना बाकीचे नेते या कठीण काळात गायब झालेत.
Ranjitsingh Naik-Nimbalkar Jayakumar Gore
Ranjitsingh Naik-Nimbalkar Jayakumar Goreesakal
Updated on

म्हसवड (सातारा) : माण-खटाव मतदारसंघात कोरोना बाधितांची संख्या वाढताना बाकीचे नेते या कठीण काळात गायब झाले आहेत. आमदार जयकुमार गोरे रुग्णांच्या मदतीसाठी कायमच तत्पर राहात आहेत. मायणी मेडिकल कॉलेजमध्ये हजारो रुग्णांवर उपचार केले जात आहेत. इतरांना ऑक्‍सिजन पुरविण्याचे कामही ते करत आहेत, असे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले.

आमदार गोरे यांच्या प्रयत्नातून म्हसवड येथे सुरू होत असलेल्या कोरोना उपचार केंद्राच्या तयारीची पाहणी करताना ते बोलत होते. या वेळी आमदार गोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माण तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, पालिकेतील विरोधी पक्षनेते अकिल काझी, नितीन दोशी, डॉ. वसंत मासाळ, सिद्धार्थ गुंडगे, माण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, नगरसेवक सुरेश म्हेत्रे, राजेंद्र कोल्हे, धनाजी माने, गणेश केसरकर, रामचंद्र नरळे आदी उपस्थित होते. श्री. निंबाळकर म्हणाले, "माढा लोकसभा मतदारसंघात आवश्‍यक त्या ठिकाणी मी रुग्णांना मदत मिळवून देत आहे. कोरोनाचा प्रभाव वाढला असताना आमदार गोरे माण- खटाव मतदारसंघाचा ऑक्‍सिजन असल्यासारखे रात्रंदिवस मैदानात उतरून काम करत आहेत. त्यांचे दातृत्व, कर्तृत्व आणि जनतेविषयीची तळमळ फार मोठी आहे. त्यांनी सुरू केलेल्या प्रत्येक कोरोना उपचार केंद्रांना मी लागेल ती मदत करीत आहे.''

आमदार गोरे म्हणाले, "म्हसवड परिसरात ऑक्‍सिजन बेड्‌सची कमतरता भासत असल्याने आम्ही 50 ऑक्‍सिजन आणि 50 साधारण बेडचे उपचार केंद्र सुरू करत आहोत. या केंद्रात जनरेटर, रुग्णांचे जेवण, नाष्टा आणि उपचारांची व्यवस्था करत आहोत. डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. मायणी मेडिकल कॉलेजचे कर्मचारी येथे कार्यरत होणार आहेत. खासदार निंबाळकर आम्हाला लागेल ती मदत करत आहेत. ऑक्‍सिजन लाईनसाठी त्यांनी तत्काळ निधीही उपलब्ध करून दिला आहे.''

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.