सातारा : अतिवृष्टीमुळे (Heavy Rain In Satara) बाधित झालेल्या कुटुंबांना राज्य शासन व प्रशासन मदत करीत आहे. सध्या विविध विभागांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. या पंचनाम्यात एकही बाधित कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी केल्या. अतिवृष्टीमुळे बाधितांसाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठकीत घेण्यात आला. या वेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai), खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil), आमदार पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, महेश शिंदे, दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल उपस्थित होते. (Instructions To The Administration Of Minister Balasaheb Patil To Provide Relief To Those Affected By Rain bam92)
सध्या विविध विभागांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
अतिवृष्टीमुळे ज्या गावांची पाण्याची योजना वाहून गेली किंवा खराब झाली आहे, अशा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशा सूचना करून पालकमंत्री पाटील म्हणाले,‘‘ ज्या गावांचा दळणवळणाचा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे, तेथे तात्पुरता रस्ता तयार करावा. ज्या गावांमध्ये वीज नाही, त्या गावांमध्ये विद्युत वितरण कंपनीने तत्काळ काम सुरू करून विजेची व्यवस्था करावी. पंचनामा करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी कमी पडत असतील तर जिथे अतिवृष्टी झाली नाही, अशा तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. शेतीचे पंचनामे करत असताना शेतकऱ्यांच्या खासगी विहिरींचेही पंचनामे करावेत. अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही, अशा तालुक्यांतील शाखा अभियंत्यांची मदत घ्यावी.’’
पंचनाम्याची अंतिम यादी तयार करताना यादी स्थानिक आमदारांना दाखवावी, अशा सूचना राज्यमंत्री देसाई यांनी केल्या. अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनाबाबत धोरण निश्चीत करावे. तसेच ज्या गावांना भूस्खलनाचा धोका आहे, अशा गावांनी पुढे यावे, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी सिंह यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची व प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीत उपस्थित आमदारांनी उपयुक्त अशा सूचना केल्या.
Instructions To The Administration Of Minister Balasaheb Patil To Provide Relief To Those Affected By Rain bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.