Javed Manore Passed Away : व्हॉलीबॉलचे आंतरराष्ट्रीय पंच जावेद मनोरे यांचे वडूजमध्ये निधन

विद्यापीठ तसेच राज्य पातळीवरील त्यांनी व्हॉलीबॉलचे अनेक खेळाडू घडविले होते.
Javed Manore Passed Away
Javed Manore Passed AwaySakal
Updated on

वडूज : येथील सामाजिक कार्यकर्ते व शुटिंग बॉल व्हॉलीबॉलचे नामांकीत अंतरराष्ट्रीय पंच जावेद बाशुमिया मनोरे (वय ५० ) यांचे आज येथे निधन झाले. त्यांच्या मागे आई,वडील,तीन बंधू,बहिण,पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शुटिंग बॉलचे ते राष्ट्रीय खेळाडू म्हणून परिचीत होते.

सलग १५ वर्षे ते महाराष्ट्र राज्य संघाचे पंच म्हणून काम पाहत होते. तसेच महाराष्ट्र संघाचे ते कायम उपकर्णधार होते.व्हॉलीबॉलचे देशपातळीवर नामांकीत खेळाडू म्हणून त्यांची ख्याती होती. विद्यापीठ तसेच राज्य पातळीवरील त्यांनी व्हॉलीबॉलचे अनेक खेळाडू घडविले होते. व्हॉलीबॉल क्षेत्रात त्यांचा खेळाडूंमध्ये आदरयुक्त दबदबा होता.

डायमंड स्पोर्टस क्लबचे ते अध्यक्ष होते. युवकांना ते व्हॉलीबॉलचे कायम प्रशिक्षण देत होते. केंब्रीज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ते क्रिडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. व्हॉलीबॉलच्या नेत्रदिपक खेळाबद्दल तसेच योगदानाबद्दल त्यांना विविध संस्थांच्यावतीने पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले होते. शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराची त्यांची संधी हुकली होती. सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते.

विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. राज्याच्या विविध भागांतील खेळाडूंनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा.बंडा गोडसे यांचे ते जीवलग व निष्ठावंत कार्यकर्ते तसेच मंगेश लंच होमचे मालक संजय इंगळे यांचे जवळचे स्नेही म्हणून परिचीत होते. येथील जुन्या पिढीतील मोटार मेकॅनिक बाशुमिया मनोरे (मिस्त्री) यांचे ते पुत्र तर मुश्ताक, साजिद, माजिद मनोरे यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.