Satara-Pune Highway : खंबाटकी घाटात चाललंय काय? बोगद्यात पुन्हा कारच्या बोनेटवर आदळला लोखंडी अँगल, प्रवाशांचा जीव धोक्यात

तीन दिवसांत सलग दोनवेळा झाल्याने महामार्ग प्राधिकरणाला 'उघडा डोळे, बघा नीट' म्हणण्याची वेळ आली आहे.
Khambatki Ghat Satara-Pune Highway
Khambatki Ghat Satara-Pune Highwayesakal
Updated on
Summary

900 मीटरच्या बोगद्यात प्रत्येक 10 फुटावर असा अँगल आहे. हे लोखंडी अँगल सन 2000 ला बसवण्यात आले.

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावर (Satara-Pune Highway) गुरुवारी रात्री दीड वाजता खंबाटकी बोगद्यात (Khambatki Ghat) पुन्हा लोखंडी अँगल स्विफ्ट कारच्या (MH-01 -BG-7760) बोनेटवर आदळला. सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, यावेळी एकाच लेननं वाहतूक सुरु ठेवली होती. अशी घटना तीन दिवसांत सलग दोनवेळा झाल्याने महामार्ग प्राधिकरणाला 'उघडा डोळे, बघा नीट' म्हणण्याची वेळ आली आहे.

Khambatki Ghat Satara-Pune Highway
Ashok Chavan : कोल्हापूर-मुंबईत दहा बैठका घेतल्या, तरीही मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही; असं का म्हणाले माजी मुख्यमंत्री?

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी बोगद्यातील एकच लेन सुरु ठेवण्यात आली. दरम्यान, हा लोखंडी अँगल काढण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (N.H.I.) कडून क्रेन उपलब्ध झाली नाही. यावेळी महामार्ग पोलिस भुईंज, जोशी विहीर यांनी सदरचा अँगल महामार्ग पोलिसांनी प्रवाशांच्या मदतीनं हातानं उचलून बाजूला केला.

यानंतर अडीच तासानं पुण्याकडं जाणारी वाहतूक दुसरी लेन ही सुरु झाली. यावेळी भुईंजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षद गालींदे, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, कृष्णकांत निंबाळकर, हवालदार संतोष लेंभे यांनी शर्थीनं खिंड लढवत हा मोठा अँगल प्रवाशांच्या मदतीनं बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

Khambatki Ghat Satara-Pune Highway
National Highway : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 18 तास वाहतूक कोंडी; काय आहे कारण?

खंबाटकी बोगद्यात 50 लोखंडी अँगल

900 मीटरच्या बोगद्यात प्रत्येक 10 फुटावर असा अँगल आहे. हे लोखंडी अँगल सन 2000 ला बसवण्यात आले. याला आता 22-23 वर्ष झाल्याने ते गंजून खाली पडत आहेत. बोगद्यात जवळपास 50 असे भलेमोठे लोखंडी अँगल आहेत. हे लोखंडी अँगल महामार्गावरील चालू गाडीवर पडल्यास जीवघेणे ठरू शकतात. याची प्रशासनानं गंभीर दखल घेणं गरजचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.