सातारा - औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेश नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील १८ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधील तीन हजार ९०० जागांसाठी चार हजार ८०३ प्रवेश अर्ज आले आहेत.
त्यामुळे यंदाही प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश इच्छुकांची संख्या जास्त असल्याने आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान, प्रवेश अर्जांची छाननी होऊन पहिल्या प्रवेश यादीतील अंतिम गुणवत्ता यादी १४ जुलै रोजी जाहीर होणार आहे.
आयटीआयचे विविध ट्रेडचे प्रशिक्षण एक ते दोन वर्षांपर्यंतचे असते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर औद्योगिक कारखान्यांमध्ये हमखास नोकरी मिळते. त्यामुळे कमी कालावधीत रोजगार उपलब्ध होत असल्याने दहावी व बारावी नंतर तरुणांचे आयटीआयच्या शिक्षणाकडे ओढा वाढला आहे. मागील काही वर्षांत सरकारी नोकरींचीही संख्या कमी झाली आहे.
सुरक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असल्याने अलीकडे पारंपरिक शिक्षणापेक्षा रोजगाराभिमुख शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाबरोबर कमी कालावधीचे प्रशिक्षण व हमखास रोजगारमुळे आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात आयटीआय प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश मागणी जास्त आहे.
दृष्टिक्षेपात...
जिल्ह्यात एकूण ११ शासकीय व सात खासगी संस्था
एकूण १८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था
तीन हजार ९०७ जागांसाठी चार हजार ८०३ अर्ज
पहिल्या प्रवेश फेरीतील गुणवत्ता यादी : १४ जुलै
पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया : १५ ते १९ जुलै
आयटीआयच्या विविध ट्रेडसाठी नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्ज नोंदणीची मुदत संपली आहे. जिल्ह्यात ११ शासकीय व सात खासगी अशी एकूण १८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. या प्रक्रियेत पहिल्या प्रवेश यादीतील अंतिम गुणवत्ता यादी १४ जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर १५ जुलैपासून प्रत्यक्ष प्रवेश दिले जाणार आहेत.
- प्रशांत हतागळे, जिल्हा समन्वयक, आयटीआय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.