गोळीबारानंतर आॅपरेशनमध्ये तीन अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू- काश्‍मीरमधील दुर्गामुल्ला भागात वावदरेचे जवान संतोष जगताप झाले होते जखमी
Jammu and Kashmir 3 militants were killed in operation after shooting Santosh Jagtap
Jammu and Kashmir 3 militants were killed in operation after shooting Santosh Jagtapsakal
Updated on

जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये पोस्टिंग होते. या सेक्टरमधील दुर्गामुल्ला भागातून सात सप्टेंबर २०१६ मध्ये सुमारे २० ते २२ जवानांच्या गाड्यांचा ताफा जाताना पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास शेतात लपून आंबुस लावलेल्या तीन दहशतवाद्यांनी ताफ्यावर फायरिंग केले. बसमधील जवान व प्रोटेक्शन ग्रुपच्या जवानांनीही क्रॉस फायरिंग सुरू केले. या हल्‍ल्यात ताफ्यातील बसमध्ये बसलेले दोन जवान हुतात्मा झाले तर सातारा जिल्ह्यातील वावदरे येथील हवालदार संतोष रामचंद्र जगताप (निवृत्त) यांच्या गळ्याजवळ दोन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अतिरेक्यांच्या हल्‍ल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संपूर्ण भागाला वेढा देत सर्च ऑपरेशन करून तीनही दहशतवाद्यांचा खात्मा केला. हा थरार स्वतः श्री. जगताप यांनी सांगितला.

संतोष जगताप हे २००२ मध्ये इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनिअर (ईएमई) मध्ये कोल्हापूर येथे भरती झाले. सुरुवातीला बेसिक ट्रेनिंग व ट्रेड ट्रेनिंग सिकंदराबाद येथे दोन वर्षे पूर्ण करून त्यांची २००४ मध्ये जम्मू-काश्‍मीरमधील अखनूर येथे पोस्टिंग झाले. त्यानंतर २००७ मध्ये अमृतसरला बदली झाल्यानंतर त्यांना लान्स नाईकपदी बढती मिळाली. २०१० मध्ये श्री. जगताप यांचे पोस्टिंग अरुणाचल प्रदेशमधील टेंगा या चीनच्या सीमेवर झाले. या ठिकाणचा परिसर पहाडी व खडतर. या परिस्थितीशी सामना करत त्यांनी काम केले. दोन वर्षे काम करून त्यांनी मिसामारी (गुवाहाटी) येथे दीड वर्ष सेवा बजावली. या ठिकाणी त्यांना नाईक या पदावर बढती मिळाली. त्यानंतर त्यांची २०१५ मध्ये ओडिशा (गोपाळपूर) येथे पोस्टिंग झाले.

दरम्यान, ओडिशा येथे दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांना हवालदारपदी बढती मिळाली होती. त्यानंतर त्यांचे पोस्टिंग कुपवाडा जिल्ह्यात २४६ फिल्ड रेजिमेंटमध्ये झाले होते.या भागात दहशतवादी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहावयास मिळते. या पहाडी व घनदाट परिसरात सेवा बजावून जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला होता. सात सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे सहा वाजता जवानांची कानवाई कुपवाड्यावरून निघून २० ते २५ मिनिटांत दुर्गामुल्ला या ठिकाणी आली होती. हा संपूर्ण परिसर पहाडी असून, या भागात मका, भाताची शेती आहे. या शेतात लपून बसलेल्या जवानांनी अचानक पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यास सुरुवात केली. या अतिरेक्यांना जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, दहशतवादी पळून गेले.

श्री. जगताप यांच्या गाडीत २० जवान बसले होते. या हल्‍ल्यात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर श्री. जगताप हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी सर्च ऑपरेशन राबवीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीनंतर श्री. जगताप यांना हेलिकॉप्टरमधून श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये नेऊन गळ्यात घुसलेल्या बुलेट काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली. तिथून उधमपूर येथील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर दिल्ली येथील आरआर हॉस्पिटलमध्ये दोन महिने उपचार केले. परंतु, मणका व इतर अवयव पूर्णपणे काम करत नसल्याने पुणे येथे मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दोन वर्षे उपचार घेतल्यानंतर प्रकृती बरी झाली आहे. २०१८ मध्ये श्री. जगताप हे सैन्यदलातून निवृत्त झाले.

धाडसाचे कौतुक

सैन्यदलात काम करताना अतिरेक्यांच्या हल्‍ल्यात जखमी झाल्यानंतर तत्काळ उपचार मिळाल्याने संतोष जगताप बरे झाले आहेत. त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी मुंबई, सातारा व इतर शहरांतील सैन्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांनी संतोष यांचा गौरव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.