'आमदार गोरेंना तत्काळ अटक करा, अन्यथा 25 ला आंदोलन'

Jayakumar Gore
Jayakumar Goreesakal
Updated on
Summary

आमदार गोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

मायणी (सातारा) : मृत व्यक्तीच्या नावे संगनमताने बोगस कागदपत्रे बनविणे, प्रतिज्ञापत्र तयार करून अनुसूचित जातीच्या घटकांची फसवणूक करणे आदी बेकायदेशीर कृत्यांबद्दल आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत (Atrocities Act) गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप त्यांना पोलिसांनी (Police) अटक केली नाही. गोरेंना तत्काळ अटक करावी, अन्यथा सोमवारी (ता. २५) जनता क्रांती दल (Janata Kranti Dal) व समविचारी संघटनांना बरोबर घेऊन तहसील कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

त्यासंबंधीचे लेखी निवेदन आज जनता क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी खटाव तहसीलदारांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, मायणीतील महादेव भिसे यांचे वडील पिराजी विष्णू भिसे हे वृध्दापकाळाने मयत झाले. तरीही त्यांच्या जागी कोणीतरी अज्ञात उभा करून त्याचे बनावट आधारकार्ड तयार करून आमदार व इतर कार्यकर्त्यांनी शंभर रुपयांचे स्टॅम्पवर बोगस प्रतिज्ञापत्र तयार केले. भिसे यांच्या आधारकार्डाची छेडछाड करून बनावट आधारकार्ड तयार केले.

Jayakumar Gore
'शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं शल्य सर्वांनाच, पण..'

आमदार गोरे यांनी सहकाऱ्यांशी संगनमत करून भिसेंच्या ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून भिसे कुटुंबीयांची फसवणूक केली आहे. भिसे कुटुंबीयांच्या घरावरही त्यांनी टाच आणली आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप त्यांना पोलिसांनी अटक केली नाही. आमदार गोरे यांना अटक झाली नाही तर सोमवारी (ता.२५) वडूज तहसील कार्यालयावर जनता क्रांती दल समविचारी संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, गणेश भिसे, विकास सकट, दत्ता केंगार यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.