जिल्हाधिकाऱ्यांसह नागरिकांची नगराध्यक्षांकडून फसवणूक

Karad Municipality
Karad Municipalityesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : येथील पालिकेच्या (Karad Municipality) २०२१ - २०२२ सालच्या अंदाजपत्रकास विशेष सभेत उपसूचनेद्वारे बहुमताने अंदाजे मंजुरी मिळाली आहे. तरीही नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास कागदपत्रे देताना खोटे अहवाल दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जनशक्तीचे गटनेते राजेंद यादव (Janshakti leader Rajendra Yadav) यांनी केली आहे. आघाडीतर्फे जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांना निवदेन दिले आहे. यावेळी महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, बापू देसाई उपस्थित होते. (Janshakti Leader Rajendra Yadav Accuses Mayor Rohini Shinde Of Cheating Satara Political News)

Summary

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास कागदपत्रे देताना खोटे अहवाल दिले आहेत.

जनशक्तीच्या (Janshakti Aghadi) निवेदनात म्हटले आहे की, पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प (Karad Municipal Budget) २५ फेबुवारी पालिकेच्या विशेष सभेत सुहास जगताप यांनी मांडला. त्यास विद्या पावसकर यांनी अनुमोदन दिले. जनशक्ती आघाडीच्या सदस्यांनी त्याला विरोध केला होता. त्यात विकासाचा विचार झाला नव्हता. सभागृहात जनशक्तीच्या सदस्यांनी विकासात्मक चर्चा केली व त्यानंतर उपसूचनेव्दारे सन अंदाजपत्रक सादर केले. त्यास बहुमताने मंजुरी मिळाली होती. तरीही ती वस्तूस्थिती डावलून नगराध्यक्षा शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला एकमताने अर्थसंकल्प मंजूर झाल्याचे खोटे लेखी कळविले आहे. हा लोकशाही, नगरसेवक, जिल्हाधिकारी कार्यालय व कऱ्हाडकरांची फसवणूक आहे. यापूर्वी बहुमताने मांडलेले ठराव डावलून नगराध्यक्षांनी मनमानी करत सभागृहाचा अवमान केला आहे.

Karad Municipality
ठेक्यासाठी लाठ्या-काठ्या, तलवारी बाहेर काढल्या जातात; 'लोकशाही'ची खंत

जिल्हाधिकारी कार्यालयास नगराध्यक्षांनी ३० मार्च रोजी पत्र दिले. त्यात जनशक्ती आघाडीने उपसूचना मांडली, असे स्पष्ट लिहिले आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी २५ मार्च रोजी अर्थसंकल्पासंदर्भात अहवाल दिला आहे. त्यात पंतप्रधान आवास योजनेचा मुद्दा वगळता जनशक्ती आघाडीची उपसूचना बहुमताने मंजूर झाली आहे, असे स्पष्ट नमूद आहे. यापूर्वी नगराध्यक्षांनी कागदपत्रे गहाळ करणे, सभागृहाची कामाची चित्रफित गायब करणे, फेरफार करणे असे प्रकार केले आहेत. २७ सप्टेंबरच्या सभेची चित्रफित जनशक्ती आघाडीने मागितली असता, उपलब्ध नाही असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत लोकशाही आघाडीच्या सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी यांनी अजून अंदाजपत्रक मंजूर केले नाही, असा ठपका नगराध्यक्षा ठेवत आहेत. त्यासाठी खोटी लेखी माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी.

Karad Municipality
पालकमंत्र्यांच्या 'लोकशाही'चा पालिका निवडणुकीत स्वबळाचा शड्डू!

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना अंदाजपत्रकाबाबत सर्व माहिती दिली आहे. कागदपत्रे सादर केली आहेत. जिल्हाधिकारी लवकरच अंदाजपत्रकाबाबत निर्णय घेतील. सभागृहातील वस्तूस्थिती महत्वाची आहे.

-राजेंद्र यादव, गटनेते, जनशक्ती आघाडी, कऱ्हाड

Janshakti Leader Rajendra Yadav Accuses Mayor Rohini Shinde Of Cheating Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.