Shivendraraje Bhosale : विरोधकांचा विषय आता संपल्यात जमा; सभेत आक्रमक होत शिवेंद्रराजेंनी कोणावर साधला निशाणा?

महू हातगेघरचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने लवकरच मार्गी लागेल.
BJP MLA Shivendraraje Bhosale
BJP MLA Shivendraraje Bhosaleesakal
Updated on
Summary

दरवेळी कोणतीही निवडणूक लागली की काहींना निवडणूक लादण्याची हौस येते.

कुडाळ : जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तालुक्यातील सर्व गट-तट एकत्र आले. मात्र, दरवेळी कोणतीही निवडणूक लागली की काहींना निवडणूक लादण्याची हौस येते. मात्र, प्रत्येक निवडणुकीत मतदार त्यांना मताच्या रूपात त्यांची जागा दाखवून देतात, त्यामुळे अशा विरोधकांचा विषय आता तालुक्यातून संपल्यात जमा असल्याचे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

BJP MLA Shivendraraje Bhosale
CM Siddaramaiah : 'धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा'; मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे शिफारस

जावळी- महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची (Jawali Krushi Utpanna Bazar Samiti) वार्षिक साधारण सभा कुडाळ (ता. जावळी) येथे झाली, त्यावेळी आमदार भोसले (Shivendraraje Bhosale) बोलत होते. ते म्हणाले, ‘‘महू हातगेघर धरणाचे काम पूर्ण होऊन लवकरात लवकर शिवारात पाणी यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, जसे बोंडारवाडीचे काम मार्गी लावले, तसेच महू हातगेघरचे कामही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने लवकरच मार्गी लागेल.

BJP MLA Shivendraraje Bhosale
Chiplun : 'मी उद्धव ठाकरेंसोबतच, पक्षाशी गद्दारी करणं आमच्या रक्तात नाही'; सामंतांच्या भेटीनंतर कदमांचं स्पष्टीकरण

तसेच बाजार समितीच्या (Kudal Bazar Samiti) नवीन संचालक मंडळाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असून, यासाठी सभासद शेतकऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे, बाजार समितीच्या वतीने नवीन इमारत, व्यापारी गाळे, पेट्रोल पंप, आदी नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत, तेही लवकरच पूर्णत्वास जातील, येणाऱ्या हंगामात प्रतापगड कारखाना जोमाने सुरू होणार असून, सर्व शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त ऊस तालुक्यातील आपल्या हक्काच्या कारखान्यालाच द्यावा.

BJP MLA Shivendraraje Bhosale
'पाय काढायला निघालेत, जनता चिडली तर तुमच्या कमरेला लंगोटही राहणार नाही'; रणजितसिंहांची रामराजेंवर सडकून टीका

यावेळी माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगडचे अध्यक्ष सौरभ शिंदे, माजी शिक्षण सभापती अमित कदम, राजेंद्र राजपुरे, ज्ञानदेव रांजणे, सभापती जयदीप शिंदे, उपसभापती हेमंत शिंदे यांच्यासह सर्व संचालक, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे यांनी या सभेमध्ये बाजार समितीने उत्पन्न वाढ व विकासाच्या दृष्टीने केलेली उपाययोजनांची माहिती दिली, तर उपसभापती हेमंत शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. संचालक मच्‍छिंद्र मुळीक यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()