जवान सुरज शेळके यांना वीरमरण

खटाव परिसरात शोककळा; उद्या अंत्यसंस्कार
Jawan Suraj Shelkhe
Jawan Suraj ShelkheSakal
Updated on

खटाव - येथील जवान सूरज प्रताप शेळके (वय २३) यांना सीमेवर सेवा बजावताना लडाख येथे वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे खटाव परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे आईवडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

कर्तव्यावर असताना काल (गुरुवारी) प्रकृती अस्वास्थामुळे लडाख येथे त्यांचे निधन झाल्याचे लष्कराकडून शेळके कुटुंबाला कळविण्यात आले. या बातमीमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. जवान सूरज शेळके यांचे प्राथमिक शिक्षण खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण येथील श्री लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूलमध्ये झाले होते. बारावीपर्यंतचे शिक्षण येथील शहाजीराजे महाविद्यालयात झाले होते. नंतर ते २०१८ मध्ये लष्करात भरती झाले होते. नाशिक येथे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले होते.

१४१ फिल्ड रेजिमेंटमध्ये सध्या ते लान्स नाईक या पदावर सेवा बजावत होते. त्यांची पोस्टिंग लडाख येथे होती. सेवा बजावताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले व लगेचच ते बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. त्यांना जवळच्याच लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.अडीच महिन्यांपूर्वी ते खटावला सुटीवर आले होते.

सध्या लेह लडाखमध्ये वातावरण खराब असल्याने सूरज यांचे पार्थिव लष्करी तळावर आणण्यात अडचणी येत आहेत. सुरवातीला दिल्ली, नंतर पुणे येथे विमानाने त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव खटावला आणण्यात येणार असून, त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनमिळाऊ स्वभावाच्या सूरज यांना वीरमरण आल्याने खटाव परिसर शोकसागरात बुडाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.