Karad News : कऱ्हाड बाजार समितीत कोल्हापूरच्या शेतकऱ्याच्या गुळाने खाल्ला भाव; क्विंटलला मिळाला 'इतका' उच्चांकी दर..

कऱ्हाड येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुळाचे मोठ्या प्रमाणात सौदे होता. यंदाही ते सुरु आहेत.
apmc karad
apmc karadsakal
Updated on

कऱ्हाड - कऱ्हाड (जि. सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीत गुळाच्या आजच्या सौद्यात कोतोली (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी अरुणकुमार दौलू पाटील यांच्या गुळाला तब्बल सहा हजार ८०० रुपये तर पार्ले (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी निखील मारुती नलवडे यांच्या गुळाला सहा हजार ४०० रुपये उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुळाचे मोठ्या प्रमाणात सौदे होता. यंदाही ते सुरु आहेत. येथील गुळाला दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान येथुन मागणी होते. त्यामुळे गुळाची उलाढालही मोठ्या प्रमाणात होते. बाजार समितीत आज झालेल्या सौद्यातील गुळाची आवक मे. शिवतेज ट्रेडींग कंपनी या आडत दुकानांत झाली होती.

सौद्यावेळी मार्केट यार्डमधील खरेदीदार व्यापारी मे. ए. एफ. ट्रेडर्स व मे. डी. के. ब्रदर्स यांनी खरेदी केला. आजच्या सौद्यांमध्ये ४४८ क्विंटल गुळाची बिक्री होवून गुळाला सरासरी भाव चार हजार १०० रुपये दर मिळाला. निखील नलवडे या शेतक-यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांच्याहस्ते झाला.

यावेळी बाजार समितीचे संचालक जयंतीलाल पटेल, शिवतेज ट्रेडींग कंपनीचे मालक उत्तमराव जाधव, बाजार समितीचे प्रभारी सचिव आबासाहेब पाटील, संतोष पवार, दिलीप पाटील, सचीन पवार, संपत बडेकर, भाजीपाला मार्केट असोशिएशनचे अध्यक्ष वसंतराव आळंदे, सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत होते.

कऱ्हाड बाजार समिती गुळाच्या सौद्यासाठी प्रसिध्द आहे. शेतकऱ्यांनी रसाळ, कणीदार, चिक्की स्वरुपाचा, भेसळरहीत गुळ तयार करुन मार्केट यार्डवर विक्रीस आणावा. गुळाला चांगला दर मिळत आहे.

- विजयकुमार कदम, सभापती, बाजार समिती कऱ्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.