कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी कऱ्हाड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात आजपासून मतदार संघाच्या हद्दीसह अनेक ठिकाणी स्थिरपथके तैनात करण्यात आली आहेत.
मतदार संघात येणाऱ्या वाहनांची तपासणी करून विनापरवाना ५० हजारांपेक्षा जास्त रोकड, मद्य, शस्त्रे वाहतूक किंवा इतर संशयास्पद वस्तूंची तपासणी केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण आणि कऱ्हाड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी ही माहिती दिली.