Karad Crime News : कऱ्हाडच्या गुन्हेगारीवर पोलिसांची जरब; तब्बल ८०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

दीड वर्षात तीन टोळ्या हद्दपार; आगामी लोकसभेसह अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अजून कारवाईचा फास आवळणार
karad crime police action against  800 accused  three gang exiled lok sabha election
karad crime police action against 800 accused three gang exiled lok sabha electionesakal
Updated on

Karad News : शहर परिसरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन पोलिसांनी त्याविरोधात कडक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. त्यात दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या संशयितांवर सरसकट प्रतिबंधात्मक कारवाई होण्याचे संकेत आहेत.

त्याचाच भाग म्हणून पोलिसांनी सहा महिन्यांत तब्बल ८०० संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अवघ्या आठ महिन्यात गुंडाच्या तीन टोळ्यांसह पोलिस रेकॉर्डवरील दहा जणांना सलग दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

शहरातील अद्यापही काही टोळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आहेत, तर काही प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. त्यासोबत आगामी लोकसभेच्या दृष्टीनेही पोलिसांनी राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून गुन्हेगारांच्या हालचालींच्या नोंदी घेण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गुन्हेगारीवर पोलिसी वचक बसेल, अशी अपेक्षा आहे.

गुंडाच्या टोळ्यांवर लक्ष केंद्रित

शहर परिसरात वाढत्या गुन्हेगारीची स्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी सरसकट संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेतली आहे. डीबीने आजअखेर तब्बल ८०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. फौजदार राजू डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांसह अन्य पोलिसांनाही कारवाईत हातभार लावला आहे.

वर्षा-दीड वर्षात तीन टोळ्या हद्दपार झाल्या आहेत. त्यापूर्वी सोळवंडेच्या टोळीला जुलै २०२० तर झेंडेच्या टोळीला जानेवारी २०२१ मध्ये हद्दपार केले आहे. गुंड जुनेद शेखच्या टोळीला २०२२ मध्ये हद्दपार केले आहे.

जुनेदच्या टोळीतील आमीर शेखवर यापूर्वी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा विरोधी कायद्यानुसार स्थानबद्धतेची जिल्ह्यातील दुसरी कारवाई झाली आहे. तीन टोळ्यांतील १७ जण दोन वर्षांसाठी हद्दपार आहेत. अन्य गुन्ह्यातील नऊ संशयित स्वतंत्रपणे हद्दपार आहेत.

राजकीय संशयितही रडारवर

आगामी लोकसभेसह अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अजून कारवाईचा फास आवळणार आहेत. त्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांवर थेट प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे.

त्याचा आराखडा पोलिसांनी आखला आहे. त्यामुळे काही राजकीय संशयितांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी काही टोळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे दाखल केले आहेत.

त्यावरही लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त आणखी १० जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल आहेत. त्याचाही निकाल होणार असल्याने शहरातील गुन्हेगारी क्षेत्राचे धाबे दणाणले आहेत.

डीबीची कारवाई

कऱ्हाड शहरात डीबीने सहा महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. फौजदार राजू डांगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाईत गती आल्याचे दिसते. त्यात डीबीने वर्षानुवर्षे फरार असलेले आठ संशयित आरोपी त्यांनी

गजाआड केले आहेत. त्याशिवाय तीन वेगवेगळ्या कारवाईत तब्बल पावणेचार किलोचा गांजा त्यांनी जप्त करून त्यात पाच जणांना अटक केली आहे. डीबीने आजअखेर ३१ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यातही काहीजणांना अटक आहे. चोरीस गेलेले ३५ मोबाईल संचही पोलिसांनी जप्त केले आहेत. शहर परिसरात अवैध पिस्तूल तस्करी

करणाऱ्या पाच जणांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून पिस्तूलही जप्त केले आहे. शहर परिसरात झालेल्या जबरी चोरीचे चार गुन्हेही डीबीने उघड केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.