Rickshaw Accident : 'त्या' सेल्फी पाठोपाठच धडकली मृत्यूची बातमी; गणेशोत्सवाला मुंबईहून गावी आलेला युवक अपघातात ठार, दोघे जखमी

रस्त्याकडेच्या क्रॅशबॅरिअरला धडकून रिक्षा पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला.
Karad Dhebewadi Route Rickshaw Accident
Karad Dhebewadi Route Rickshaw Accidentesakal
Updated on
Summary

रात्री मित्रांसमवेत रिक्षातून कऱ्हाडला गेल्यावर तेथे सर्वांनी आईस्क्रीम खाल्ले व कोल्हापूर नाक्यावर आय लव्ह कऱ्हाड पॉइंटवर सेल्फीही घेत मित्रांच्या ग्रुपवर पाठवली.

ढेबेवाडी/विंग : रस्त्याकडेच्या क्रॅशबॅरिअरला धडकून रिक्षा पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. कऱ्हाड- ढेबेवाडी मार्गावर कणसेमळा (विंग, ता. कऱ्हाड) येथे काल रात्री उशिरा हा अपघात झाला.

Karad Dhebewadi Route Rickshaw Accident
Devgad Crime : ऐन गणेशोत्सवात कोकण हादरलं! खून झालेल्या प्रसादच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, मिठबांवात खळबळ

प्रवीण यशवंत कळंत्रे (वय ३२, रा. माटेकरवाडी- कुंभारगाव, ता. पाटण) असे मृत युवकाचे नाव असून, पाच दिवसांपूर्वीच ते गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आले होते. कऱ्हाड तालुका ग्रामीण पोलिस (Karad Police) ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

याबाबतची माहिती अशी, कुंभारगाव विभागातील माटेकरवाडीतील चौघे जण काल रात्री रिक्षात (एमएच ४३ सीए १९०४) सीएनजी भरण्यासाठी कऱ्हाडला गेले होते. गॅस भरून रिक्षातून गावाकडे परतताना रात्री पावणेबाराच्या सुमारास कऱ्हाड- ढेबेवाडी मार्गावरील कणसे मळा- विंगजवळ रिक्षाला अपघात झाला.

Karad Dhebewadi Route Rickshaw Accident
Sadabhau Khot : 'दीड वर्ष आम्ही मशागत केली आणि वीस दिवसांत धैर्यशील माने खासदार झाले, आता त्यांनी पैरा फेडावा'

अचानक समोरून कोणता तरी प्राणी पळत आडवा आल्याने चालकाचा गोंधळ उडाला व रिक्षा रस्त्याकडेला लावलेल्या क्रॅशबॅरिअरला धडकून पलटी झाल्याने अपघात झाला, असे सांगण्यात येत आहे. अपघातात प्रवीण कळंत्रे गंभीर जखमी झाले होते, तर समवेत असलेल्या तिघांपैकी दोघांना दुखापत झाली होती. ये- जा करणाऱ्यांनी वाहने थांबवून आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे प्रवीण यांचा मृत्यू झाला.

Karad Dhebewadi Route Rickshaw Accident
Sharad Ponkshe : 'बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता'

मित्रांसह ग्रामस्थांना मोठा धक्का

प्रवीण कळंत्रे मुंबईत नोकरीला होते, पत्नी व लहान मुलीसह ते तिकडेच राहण्यास असतात. गावाकडे त्यांचे आई- वडील राहतात. प्रवीण पाच दिवसांपूर्वी गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आले होते. रात्री मित्रांसमवेत रिक्षातून कऱ्हाडला गेल्यावर तेथे सर्वांनी आईस्क्रीम खाल्ले व कोल्हापूर नाक्यावर आय लव्ह कऱ्हाड पॉइंटवर सेल्फीही घेत मित्रांच्या ग्रुपवर पाठवली.

Karad Dhebewadi Route Rickshaw Accident
Khambatki Tunnel : पुण्यातील युवकाचा मृतदेह खंबाटकी बोगद्याजवळ छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला; पाच दिवस सुरू होता कसून शोध

सेल्फी बघून काही मिनिटे होतात न होतात तोच अपघाताची व प्रवीण यांच्या मृत्यूची बातमी समजताच मित्रांसह ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. प्रवीण यांचा सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग असायचा. परिसरात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. ते नावाजलेले क्रिकेट खेळाडू होते. त्यांच्या निधनाने कुंभारगाव परिसरात शोकाकूल वातावरण आहे. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.