35 हजार ठेवीदारांचे 302 कोटी परत, दिवाळीच्या तोंडावर परताव्याने आनंद

ठेवीदारांतही आनंदाचे वातावरण
Karad Janata Sahakari Bank
Karad Janata Sahakari Bankesakal
Updated on
Summary

दिवाळीच्या तोंडावर रक्कम परताव्याला गती आल्याने ठेवीदारांतही आनंदाचे वातावरण आहे.

कऱ्हाड (सातारा) : दिवाळखोरीतील कराड जनता सहकारी बॅंकेच्या पाच लाख व त्याच्या आतील रकमेची ठेव असलेल्या ९० टक्के ठेवीदारांचे पैसे बँकेने परत केले आहेत. दिवाळीच्या तोंडावर रक्कम परताव्याला गती आल्याने ठेवीदारांतही आनंदाचे वातावरण आहे. पाच लाखांपर्यंत ठेव असलेल्या ३९ हजार ३२ पैकी ३५ हजार ३५२ ठेवीदारांचे पैसे परत केले आहेत. बँकेने मंजूर केलेल्या ३२९ कोटी दहा लाखांपैकी ३०१ कोटी ८० लाखांच्या ठेवी परत केल्या आहे. एप्रिल २०२१ मध्ये पैसे परताव्याला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार अवघ्या सात महिन्यांत बँकेने मंजूरपैकी ९० टक्के सभासदांच्या ठेवींची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. अद्यापही ९३ हजार सभासदांच्या ६२ कोटी रुपयांचे प्रस्ताव दाखल असून, त्यालाही लवकरच मुंजरी मिळणार आहे.

Karad Janata Sahakari Bank
कऱ्हाड : जलजीवन मिशनचा उपयोग काय?

बँकेच्या केवायसी पू्र्ण केलेल्या पाच लाखांच्या आतील ४० हजार ४१५ ठेवीदारांचे ३४८ कोटी दहा लाख रुपये परताव्याचे प्रस्ताव विमा कंपनीकडे दाखल होते. त्यापैकी ३९ हजार ठेवीदारांचे ३२९ कोटी ७६ लाख रुपयांना मंजुरी मिळून कराड जनता बॅंकेच्या खात्यात एप्रिल २०२१ मध्ये जमा झाले होते. अवघ्या सात महिन्यांत ठेवीदारांच्या रकमेचा परतावा झाला आहे. बॅंकेत पाच लाखांच्या आतील तब्बल एक लाख ३३ हजार ४२१ ठेवीदार आहेत. त्याचे ५२७ कोटी ७० लाखांच्या ठेवी बँकेकडे आहेत. त्यातील ४० हजार ४१५ ठेवीदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानुसार ३४८ कोटी दहा लाखांच्या रक्कम परताव्याचे प्रस्ताव विमा कंपनीकडे गेले. त्यानुसार ९० टक्के ठेवीदारांची रक्कम परत देण्यास मंजुरी मिळाली. त्यानुसार प्रत्यक्षात त्या नव्वद टक्के ठेवीदारांना पैसेही परत दिले आहेत.

Karad Janata Sahakari Bank
कऱ्हाड पालिकेत पाच दिवसांचा आठवडा रद्द

पाच लाखांच्या आतील ठेवीदारांचे पैसे परत देण्याबाबत कागदपत्रांची पूर्तता सुरू झाली. त्यानुसार पाच लाखांच्या आतील तब्बल ४० हजार ठेवीदारांचे ३४८ कोटींचा प्रस्ताव पाठवले गेले. पहिल्या टप्प्यात ३९ हजार ३२ सभासदांचे ३२९ कोटी ७६ लाख रुपयांची रक्कम मंजूर झाली. त्याचे टप्प्याटप्प्याने पैसे वाटले आहेत. सात महिन्यांत तब्बल ३५ हजार ६३२ ठेवीदारांना ३०१ कोटी ८० लाखांची रक्कम परतावाही केला आहे. बँकेने दुसऱ्या टप्प्यातील ९३ हजार ठेवीदारांच्या ५१ कोटी ७६ लाखाच्या रक्कम परताव्याला मंजुरी मागितली आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळणार आहे. त्यासोबत पहिल्या टप्प्यातील एक हजार ३८३ ठेवीदारांचे सुमारे १४ कोटींही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यालाही लवकरच मंजुरी मिळणार आहे.

Karad Janata Sahakari Bank
कऱ्हाड : मांडूळ, कासवाची तस्करी करणाऱ्या चौघांची टोळी गजाआड

कराड जनताच्या ठेवीदारांची स्थिती :

- बँकेकडील ठेवीदारांची संख्या - एक लाख ३३ हजार ४२१ - एकूण ठेवी - ५२७ कोटी

- विमा कंपनीकडे पहिल्या टप्प्यातील प्रस्ताव - ४० हजार ४१५ - मंजूर रक्कम - ३४८ कोटी दहा लाख

- विमा कंपनीने मंजूर केलेले प्रस्ताव - ३९ हजार ३२ - मंजूर रक्कम -३२९ कोटी ७७ लाख

- ऑक्टोबरअखेर ठेवीदारांना परत केलेली रक्कम - ३०१ कोटी ८० लाख (३५ हजार ५३२ ठेवीदार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.