'उदयनमहाराज, ही रणजीची टीम नाही तर IPL टीमचे तुम्हीच मालक आहात'; असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यासाठी सध्या जिल्ह्यात धुमशान सुरू झाले आहे.
Udayanraje Bhosale Devendra Fadnavis
Udayanraje Bhosale Devendra Fadnavisesakal
Updated on
Summary

सत्ताधारी व विरोधी पक्षांचे उमेदवार कोण असणार याकडे सर्व जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

कऱ्हाड : लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा सुरू आहेत. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी जाहीर कार्यक्रमांवर भर दिल्याचे चित्र आहे.

Udayanraje Bhosale Devendra Fadnavis
Loksabha Election : लोकसभेसाठी हसन मुश्रीफांची मोठी घोषणा, पण निर्णय दिल्लीतूनच होणार; असं काय म्हणाले मुश्रीफ?

भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कऱ्हाडला कृषी महोत्सवाच्या उद्‍घाटनासाठी आले होते. त्या कार्यक्रमात खासदार भोसले यांनी आम्हाला तुमच्या टीममध्ये घ्या, रिझर्व्हमध्ये ठेवू नका, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बघून केली. त्यावर फडणवीस यांनी तुम्हीच टीमचे मालक आहात, आम्हालाच तुमच्या टीममध्ये ठेवा, अशी उलट टिप्पणी केली. त्यावरून खासदार भोसले यांची लोकसभेसाठीची खुंटी बळकट झाल्याचेच पाहायला मिळाले.

लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यासाठी सध्या जिल्ह्यात धुमशान सुरू झाले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांचे उमेदवार कोण असणार याकडे सर्व जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार यावरही जय-पराजयाचे गणित ठरणार आहे. कऱ्हाडला डॉ. सुरेश भोसले व अतुल भोसले यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये कृष्णा कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.

Udayanraje Bhosale Devendra Fadnavis
Sharad Pawar : रामभक्तांना डावलून अयोध्येत फक्त भाजप भक्तांनाच महत्त्‍व दिलं जातंय; शरद पवारांचा रोख कोणावर?

त्यावेळी अतुल भोसलेंनी कऱ्हाडच्या स्टेडियममध्ये रणजीचेही सामने झाले असून, या स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. तोच धागा पकडून खासदार भोसले यांनी त्यांच्या भाषणात अतुल भोसलेंनी केलेली स्टेडियम दुरुस्तीची मागणी पूर्ण करा. त्यावर रणजीचे सामने कऱ्हाडला घेऊन त्या टीमचे कॅप्टन म्हणून तुम्ही या आणि त्या टीममध्ये मला घ्या, रिझर्व्हमध्ये मला ठेवू नका. नाहीतर स्टेजवर असलेले हुशार नेते मला रिझर्व्हमध्ये ठेवतील, अशी मिश्किल टिप्पणी केली.

Udayanraje Bhosale Devendra Fadnavis
मंत्र्यांची समन्वय समिती आहे कुठे? गृहमंत्री अमित शहांचा 'हा' आदेशही बासनात, कर्नाटकचे आडमुठे धोरण कायम

त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उदयनराजे महाराज ही रणजीची टीम नाही, तर आयपीएलची टीम आहे. त्या आयपीएल टीमचे तुम्हीच मालक आहात. त्यामुळे कोणाला त्या टीमच्या आत ठेवायचे, कोणाला बाहेर ठेवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे. फक्त आम्हाला तुम्ही टीममध्ये ठेवा म्हणजे झाले. महाराज हे महाविकास आघाडी नाही, तर महायुतीचेच नेते आहेत, अशी टिप्पणी करून खासदार भोसले यांची सातारा लोकसभा मतदारसंघासाठी सध्यातरी खुंटी बळकट असल्याचे स्पष्टच केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.