Karad News : मलकापूरच्या मूर्तींसाठी कोल्हापूर नाक्यावरुन मार्ग

मलकापुरमधील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमुर्तीच्या विसर्जनासाठी कोल्हापूर नाका येथुन मार्ग द्यावा, अशी मागणी तेथील मडळांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे आज केली.
Karad
KaradSakal
Updated on

कऱ्हाड - मलकापुरमधील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमुर्तीच्या विसर्जनासाठी कोल्हापूर नाका येथुन मार्ग द्यावा, अशी मागणी तेथील मडळांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे आज केली. त्याचा विचार करुन आज अधिकारी आणि पदाधिकारी यांनी काही नियम व अटींच्या आधारावर कोल्हापूर नाक्यावरुन गणेशमुर्ती विसर्जनापुरता कोल्हापूर नाक्यावरुन रस्ता देण्याचे पोलिसांनी मान्य केले. त्यानुसार उद्या कोल्हापूर नाक्यावरुन गणेशमुर्ती विर्जनासाठी नेता येणार आहेत.

पुणे-बेंगळुरु महामार्गावरील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुल पाडण्याचे काम सुरु असल्याने तेथील वाहतुक पाटण तिकाटणे मार्गे वळवण्यात आली आहे. त्याचबरोबर छोट्या वाहनांसाठी कोल्हापूर नाक्याच्या पुढील बाजुहुन वाहतुक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे त्या मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण आहे.

मात्र उद्या गणेशमुर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांना मुर्ती विसर्जनास नेताना ती पाटण तिकाटण्यातुन न्यावी लागणार आहे. त्यामुळे कोल्हापूर नाक्यावरुनही आत येताना वाहतुकीचा मोठा खोळंबा होणार आहे.

त्याचा विचार करुन, मलकापुरमधील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमुर्ती विसर्जनासाठी कऱ्हाडच्या कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर नेण्यासाठी कोल्हापूर नाक्यावरुन मार्ग द्यावा, अशी मागणी मलकापुरचे नगरसेवक राजेंद्र यादव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन काशीद, माजी नगरसेवक दादा शिंगण, हणमंतराव जाधव, शहाजी पाटील, मधुकर शेलार, भारतीय जनता पक्षाचे सुरेश शेवाळे, तानाजी देशमुख, विविध मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकारी यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.

त्यावर वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, वाहतूक शाखेचे सहाययक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी कोल्हापूर नाक्यावर भेट देवुन संबंधितांशी चर्चा केली. त्या मार्गावर कोणत्याही मंडळांना वाजंत्री, झांज पथक, लेझीम पथक, शोभायात्रा काढता येणार नाहीत या अटीवर मलकापुरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कोल्हापूर नाका येथून उद्यापुरती परवानगी देण्यात येईल. त्यामुळे उद्या मुर्तीं विसर्जनासाठी कोल्हापूर नाक्यावरुन नेण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली असल्याचे वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक सुर्यवशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.