क-हाड पालिकेचा फेर अर्थसंकल्प सादर करा; जिल्हाधिकारी

Shekhar Singh
Shekhar Singhsystem
Updated on

कऱ्हाड (जि.सातारा) : पालिका अर्थसंकल्प व नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या खोटारडेपणा विरोधात जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव व त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनी पालिका सभागृहात सुरू केलेले उपोषणाची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दखल घेत लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केले. (karad-muncipal-council-budget-rajendra-yadav-shekhar-sinh-ramakant-dake-satara-news)

उपोषणाची दखल घेत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना फेर अर्थसंकल्प सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिंह यांनी केल्या आहेत. फेर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नऊ जुलैपर्यंत त्यास मंजुरी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर यादव व नगरसेवकांनी उपोषणास स्थगिती दिली.

Shekhar Singh
वाघ है रे, वाघ है.. अतुलबाबा वाघ है!

गुरुवारी पालिकेतील प्रशासकीय काम बंद करण्याचे आवाहन करीत त्यांनी उपोषणास प्रारंभ केला. त्या उपोषणास पालिकेचे सर्व ठेकेदार, पालिका कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला.

Shekhar Singh
कोणीच विचारात घेत नसल्याने राजेंद्र यादवांचा जळफळाट; नगराध्यक्षांची टीका

या वेळी महिला व बाल कल्याण सभापती स्मिता हुलवान, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नगरसेवक किरण पाटील, गजेंद्र कांबळे, अतुल शिंदे, बाळासाहेब यादव, प्रियांका यादव, सुप्रिया खराडे, बापू देसाई, ओंकार मुळे यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.