कऱ्हाड ः शहरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालिका प्रशासन चिंतेत आहे. शहरातील तुटलेली साखळी पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत तब्बल दहा जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात त्यांच्या सहवासातील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाइन केले आहे. त्यासाठी पालिकेने वाघेरी येथे घेतलेला विलगीकरण कक्ष हाउसफुल्ल झालेला आहे. अन्य लोकांना क्वारंटाइन करायची वेळ आली तर आत्ता पालिकेकडे जागाच नाही. त्यामुळे क्वारंटाइनसाठी पालिका होस्टेलच्या शोधात आहे. त्यासाठी पालिकेने काही कॉलेजच्या व्यवस्थापनांशी बोलणी सुरू केली आहेत.
ग्रामसमित्या सक्षम केल्या तरच...
शहरात कोरोनाची साखळी दीड महिन्यापूर्वी तुटली होती. ती पुन्हा नव्याने तयार होऊ लागली आहे. त्यामुळे पालिका चिंतेत आहे. येथील कार्वे नाका परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक कोरोनाबाधित ठरला. त्यांचे उपचारावेळी निधन झाले. त्यांच्या सहवासातील पाच जणांना कोरोना झाला. त्याचवेळी ठाणे येथून आलेला एकजण कोरोनाबाधित जाहीर झाला. दुसऱ्या दिवशी विलगीकरण कक्षात सेवा बजावणारी महिला डॉक्टर, त्यानंतर मुंबईहून आलेल्या एक व्यक्तीसह महिला डॉक्टर आणि एका बॅंकेतील कर्मचारीही बाधित ठरला. त्यामुळे तो आकडा दहावर गेला. त्यामधील एकाचा मृत्यू झाला. त्यांच्या सहवासात आलेल्या 22 हून अधिक लोकांना वाघेरी येथे संस्थात्मक क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे पालिकेने वाघेरीला घेतलेला विलगीकरण कक्ष हाउसफुल्ल झाला आहे. त्यामुळे नव्याने कोणाला संस्थात्मक क्वारंटाइन करायचे झाल्यास पालिकेकडे जागाच नाही, अशी स्थिती आहे. पालिका त्यांच्यापरीने नव्या विलगीकरण कक्षासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, त्यासाठी होस्टेलची आवश्यकता आहे. पालिकेकडून शाळांचा वापर केला जातो आहे. त्या इमारतीमधील सुविधा तितक्या सुरक्षित नाहीत. विलगीकरण कक्षात क्वारंटाइन झालेले नागरिक एकत्र येता कामा नयेत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी होस्टेलची गरज आहे. जेथे एकाच खोलीत सर्व सुविधा उपलब्ध असतील, त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पालिकेकडे संस्थात्मक विलगीकरणासाठी सध्या 60 बेडची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, अजूनही बेडची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व सोयी असणाऱ्या होस्टेल, शाळांची गरज आहे. त्या ज्या संस्थांकडे आहेत, त्या शिक्षण संस्थांनी त्या पुरवाव्यात, असेही आवाहन पालिकेने केले आहे.
आर्थिक विवंचनेतून धरली मुंबईची वाट अन् पडली मृत्यूशी गाठ
शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. संस्थात्मक विलगीकरणासाठी शहरातील हॉस्टेल, शाळांची गरज आहे. संस्थात्मक विलगीकरणासाठी 60 बेडची सुविधा आहे. मात्र, अजूनही बेडची आवश्यकता आहे. जेथे सर्व सोयी-सुविधा स्वतंत्र हव्या आहेत. त्यासाठी तशा होस्टेल, शाळांची गरज आहे.
- यशवंत डांगे, मुख्याधिकारी, कऱ्हाड
संपादन - सिद्धार्थ लाटकर
प्रांताधिकारी म्हणाले, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार निर्णय घेऊ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.