तेरा नगरसेवकांसह 50 जण क्वारंटाइन; कऱ्हाड पालिका इमारत सील

तेरा नगरसेवकांसह 50 जण क्वारंटाइन; कऱ्हाड पालिका इमारत सील
Updated on

कऱ्हाड ः नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या सहवासात आलेल्या 13 नगरसवेकांसह 50 जणांना क्वारंटाइन केले आहे. हाय व लो रिस्कमधील नागरिकांची यादी काढली आहे. त्यांचेही स्वॅब पालिका घेणार आहे. पालिका इमारतही प्रशासनाने सील केली आहे. त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शहरात एकाच रात्रीत नऊ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दोन डेन्टीस्टसह एक जनरल प्रॅक्‍टीक्‍शनर डॉक्‍टरांचा त्यात समावेश आहे. शहरातील बाधितांचा आकडा 37 वर गेला असून, नागरिकांत घबराट पसरली आहे.
पालिकेच्या नगराध्यक्षांना काेराेनाची लागण
 
शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी (ता.22) कऱ्हाडच्या नगराध्यक्षा शिंदे बाधित ठरल्या. त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर एकाच वेळी नव्या नऊ जणांना बाधा झाली. त्यामुळे शहरातील बाधितांचा आकडा 37 वर गेला आहे. नव्याने बाधा झालेल्यांत तीन डॉक्‍टरांचाही समावेश आहे. 17 जणांना डिस्चार्ज दिला आहे. दोघांचा मृत्यू झाला आहे. 18 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रात्री अचानक 9 रुग्णांमध्ये भर पडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पालिका इमारत सील केली आहे. नगराध्यक्षा शिंदे यांना बाधा कशी झाली, त्याचा शोध सुरू आहे. आमदार जयकुमार गोरे यांना त्या भेटल्या होत्या. आमदार गोरे यांचे स्वीय सहायक बाधित झाले आहेत. त्यांच्यापासूनच नगराध्यक्षा शिंदे यांना बाधा झाली असावी, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

पतीच्या खूनप्रकरणात पत्नीला अडीच वर्ष सक्तमजुरी

भाजपचा 'हा' दिग्गज नेता म्हणताे, ...तर पुढची 25 वर्षे मराठा समाजाला आरक्षण नाही

नगराध्यक्षा शिंदे शनिवारपासून पालिकेत आलेल्या नाहीत. त्या आजारीच आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील व त्यांच्या ट्रव्हॅल हिस्ट्रीचा अभ्यास सुरू आहे. त्यांच्या सहवासात आलेल्या 13 नगरसवेकांसह 50 जणांना क्वारंटाइन केले आहे. त्यात पालिकेचे काही अधिकारी, कर्मचारी व नगराध्यक्षांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश आहे. तीन डॉक्‍टरांपैकी दोघेजण डेन्टीस्ट आहेत. त्यांचे येथील दत्त चौकात क्‍लिनिक आहे. दोघेही पिता-पुत्र बाधित ठरेल आहेत. ते पाटण कॉलनी येथे राहतात. तेथे कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. अन्य डॉक्‍टरांचे क्‍लीन स्टेशन रस्त्यावर आहे. त्याशिवाय शहरातील मुख्य चौकातील अन्य पाच जण बाधितांचेच नातेवाईक आहेत.
Edited By : Siddharth Latkar 

मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे?...मग 'हे' तर केलंच पाहिजे.. 

२७ जुलैला शुभेच्छा नको; करा 'हे' कामं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.