कऱ्हाड पालिकेला शासनाकडून तब्बल 10 कोटी बक्षीस येणं बाकी!

स्वच्छ सर्वेक्षणात देशभर कऱ्हाड पालिकेचा डंका
Karad Municipality
Karad Municipalityesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : स्वच्छ सर्वेक्षणात (Clean Survey 2021) गाजावाजा करत पालिकेचा (Karad Municipality) सलग दोन वर्षे देशात पहिला क्रमांक, तर त्यापूर्वी देशात २५ वा क्रमांक आला. त्या तिन्ही वर्षांपैकी २०१८ चे पाच व २०१९ चे १५ कोटी असे तब्बल २० कोटी रुपये बक्षीस पालिकेने पटकावले. २०२० मध्ये पहिला क्रमांक जाहीर केला. मात्र, त्या वेळी कोणताही निधी जाहीर केला नाही; परंतु त्यापूर्वीच्या दोन वेळा जाहीर झालेल्या २० कोटींच्या बक्षीस निधीने पालिकेच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होईल, असे वाटत असताना प्रत्यक्षात त्याच्या आर्धीच रक्कम पालिकेस मिळाली आहे. २० पैकी केवळ दहा कोटी निधी पालिकेस मिळाले आहेत. उरलेला दहा कोटी निधी अद्यापही दोन वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे.

Summary

पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात देशभर डंका वाजला आहे.

पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात देशभर डंका वाजला. सर्वेक्षणासहित माझी वसुंधरातही (Majhi Vasundhara Abhiyan) अव्वल कामगिरी पालिकेची झाली. २०१८ मध्ये पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात २५ वा क्रमांक पटकवला. त्या वेळी पाच कोटींचे बक्षीस जाहीर झाले. पालिकेने २०१९ च्या स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेऊन देशात पहिला क्रमांक मिळवला. त्या वेळी पालिकेला १५ कोटींचे बक्षीस जाहीर झाले. त्यानंतर कालवधीत दोन्ही वर्षांच्या २० कोटींपैकी पालिकेला पहिला हप्ता स्वरूपात दहा कोटींचे अनुदानही मिळाले. हा बऱ्यापैकी निधी खर्ची पडला. मात्र, स्वच्छ सर्वेक्षणातील दहा कोटींचा निधी अद्यापही पालिकेकडे प्रलंबित आहे. त्यासाठी पालिका पाठपुरावा करत आहे. मात्र, कोविडमुळे शासनाकडे निधी नसल्याने तो निधी आलेला नाही. निधी नसल्याने स्वच्छ सर्वेक्षणाची कामे करता आलेली नाहीत.

Karad Municipality
'राष्ट्रवादी'ला रोखण्यासाठी राजेंच्या भूमिकेवर 'भाजप'ची मदार

माझी वसुंधरातूनही तीन कोटी

पालिकेला स्वच्छ सर्वेक्षणासोबत माजी वसुंधरातूनही तीन कोटींचे अनुदान मिळाले आहे. २०१९ मध्ये झालेल्या वसुंधरा स्पर्धेत एक लाख, तर २०२० मध्ये झालेल्या माझी वुसंधरा स्पर्धेत तीन कोटींचे बक्षीस मिळाले आहे. त्याची पूर्ण रक्कम पालिकेस प्राप्त झाली आहे.

Karad Municipality
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला डावललं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.