कोरोना महामारी, युक्रेन-रशीया युध्दामुळे जगात मंदीचे सावट आहे. हे भविष्यातील जागतीक मंदीचे द्योतक आहे.
कऱ्हाड - कोरोना महामारी, युक्रेन-रशीया युध्दामुळे जगात मंदीचे सावट आहे. हे भविष्यातील जागतीक मंदीचे द्योतक आहे. आजचे विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडतील तेव्हा नोकरीच्या संधी कमी होतील, अशी भिती व्यक्त करुन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संगणक, रोबोमुळे मनुष्यबळ कमी होत आहे. देशात नवीन गुंतवणूक नाही, नविन व्यवसायांची निर्मिती नाही. त्यामुळे बेकारीचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कऱ्हाड (जि.सातारा) येथील शिक्षण मंडळ, टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवास आज शुक्रवारी आमदार चव्हाण यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, उपाध्यक्षा अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील, संस्थेचे संचालक उदय थोरात, कौन्सिल सदस्य अॅड. विक्रम कुलकर्णी, अॅड. सदानंद चिंगळे, सुधीर घाटे, डॉ. मीना पेंढारकर, इंद्रजित चव्हाण, टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.जी अहिरे, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला बायस आदी उपस्थित होते.
आमदार चव्हाण म्हणाले, शंभर वर्षे एखादी शिक्षण संस्था चालवणे सोपे नाही. मी देशात कुठेही शिकलो तरी मी ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिकलो ती राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा माझ्या कायम स्मरणात आहे. शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देवुन इतिहास घडवला आहे. ही महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील दुर्मिळ घटना आहे. शिक्षण संस्था आदर्श कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षण मंडळ आहे. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, ऑलिंपीकवीर खाशाबा जाधव, कोल्हटकर असे अनेक विद्यार्थी टिळक हायस्कुलने घडवले. कोरोना महामारी, युक्रेन-रशीया युध्दामुळे जगात मंदीचे सावट आहे. हे भविष्यातील जागतीक मंदीचे द्योतक आहे. आजचे विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडतील तेव्हा नोकरीच्या संधी कमी होतील.
संगणक, रोबोमुळे मनुष्यबळ कमी होत आहे. देशात नवीन गुंतवणूक नाही, नविन व्यवसायांची निर्मिती नाही. त्यामुळे बेकारीचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे. बाळासाहेब कुलकर्णी यांनी टिळक हायस्कूलने देशाच्या जडणघडणीत अनेक नेतृत्ववान विद्यार्थी दिले असुन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीवेळी संस्थेला मदत केल्याचे सांगीतले. चंद्रशेखर देशपांडे यांनी १०० वर्षात संस्थेने अमुलाग्र बदल केल्याचे सांगुण नॅशिनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून नीट व जेईई परीक्षा केंद्राची मान्यता संस्थेस प्राप्त झाली आहे. भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका बायस यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.