सचिन शिंदे
कऱ्हाड ः कऱ्हाडच्या मुजावर काॅलनीत झालेल्या स्फोटाबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे. त्या सगळ्याचा तपास एटीएस खात्याकडूनच तपास करावा, अशी मागणी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील मुजावर कॉलनी येथे मागील आठवड्यात स्फोट झाला. तेथे आमदार राणे यांनी भेट दिली. तेथील नुकसानीचीही पाहणी केली. स्फोटाबाबत तपास करणाऱ्या अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गृहखाते बदनाम होणार असेल तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा देत श्री. राणे म्हणाले, एटीएसकडूनच कऱ्हाडच्या स्फोटाचा तपास व्हावा. हिंदु समाजाच्या विरोधात कोण वागत असेल तर ते खपवूनघेतले जाणार नाही. कल्पना त्याचवेळी तुम्हाला येईल. त्यावेळी ती तुमची ब्रेकींग न्यूज असेल. जिल्ह्यातील चांगले अधिकारी आहेत. मात्र काही अधिकारी अजूनही गैरसमजात आहेत. त्यांना योग्य ती जागा दाखविण्यासाठी आम्ही सजग आहोत.
जिल्ह्यात कोण कसे काम करतो, याची जाणीव आम्हाला आहे. एटीएसने पोलिसांना गॅस गळतीचा प्राथमिक अंदाज दिला असेल तर त्यांनी लेखी स्वरूपात मला द्यावा. अन्यथा माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. बॉम्ब सदृश्य केमीकल त्या घरात आढळळे होते. त्याचा कोठे उल्लेख आला आहे का, पोलिस कोणत्या लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली काम करत आहेत. याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे त्यांची नावे या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात आवाज उठवूनच जाहीर करणार आहे. त्यात जे अधिकारी दोषी दिसतील त्या सर्वांना कामाला लावले जाणार आहे.
येथून गेल्यानंतर दौऱ्याबाबत देंवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना माहिती देणार आहे. त्यामुळे त्याचा तपास एटीएसतर्फेच करावा, असा आमचा आग्रह आहे.
श्री. राणे म्हणाले सातारा जिल्ह्यात ज्या काही पीएफआयच्या हालचाली सुरू आहेत. त्या सगळ्या रोखण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढची दिशा ठरवत आहोत. कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून नव्हे तर मी हिंदू म्हणून आलो आहे. त्यामुळे उद्या येथे बॉम्ब तयार होत असतील आणि त्याला गॅस सिलेंडरच्या नावाखाली खपवणार असाल तर ते चालू देणार नाही. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्रास द्याल तर सोडणार नाही आगामी काळातील अधिवेशनात याबाबत आवाज उठविणार आहोत.
त्यासाठी पोलिसांनी केलेल्या साऱ्य़ा तपासाची कागदोपत्री माहिती मला द्यावीच लागले. पोलिस ज्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यांच्यावर कोण दबाव आणत आहेत त्या प्रश्नावर थेट अधिवेशनात बोलेन तेथे त्याची नोंद होईल.
येतील त्यांना सोबत घेवू
पुसेसावळीच्या दंगलीत भाजपचे नेते विक्रम पावसकर यांचे नाव घेतले गेले होते. त्यावेळी भाजपचे कोणीच पुढे आले नाही. त्यावर आमदार राणे म्हणाले, त्यावेळी काय झाले, त्याची माहिती नाही. मात्र विक्रम पावसकर हिंदू धर्मासाठी काम करणारा नेता आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या सोबत आहोत. येथे पक्ष नव्हे तर हिंदू धर्म महत्वाचा आहे. त्यासाठीच मी येथे आलो आहे. जे सोबत येतील त्यांना बरोबर घेवून आम्ही हिंदू धर्मासाठी काम करणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.