कऱ्हाड - सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये बोगस नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोंदणीच्या ऑनलाईन प्रक्रियेत नमुना आठ या अर्जाव्दारे स्थलांतर दाखवून वीज देयकात खाडाखोड करीत एकाच नावाने तब्बल ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.