Karad News : पोलिसांच्या कोम्बीग ऑपरेशनमध्ये ३५ जणांवर कारवाई; दिड लाखांचा मुद्देमालसह गुटखा, हत्यारे जप्त

दै. सकाळने शहरातील कार्वे नाका होतोय हॉटस्पॉट मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी काल कार्वेनाका परिसरातील तीन कॉलन्यात सलग दोन तास कोम्बीग ऑपरेश राबवले.
Crime
Crimesakal
Updated on

- सचिन शिंदे

कऱ्हाड - दै. सकाळने शहरातील कार्वे नाका होतोय हॉटस्पॉट मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी काल कार्वेनाका परिसरातील तीन कॉलन्यात सलग दोन तास कोम्बीग ऑपरेश राबवले. त्यात तब्बल एक लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दहशत माजविणाऱ्याला सराईतालाही कोयत्यासह रंगेहात अटक केली आहे.

रात्री नऊ ते ११ या वेळेत कार्वे नाका परिसरात झालेल्या कोम्बींग ऑपरेशनमध्ये पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरिक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्यासह तब्बल ९० पोलिसांनी सहभाग घेतला होता. सिलेंडरमध्ये अवैध गॅस भरणारे २० हजारांचे यंत्र, तब्बल ३० हजारांचा गुटखा, चार संशयास्पद वाहने जप्त केली. पोलिसांच्या कारवाईत एक कोयताही जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील ३५ जणांची तपासणी करून त्यांच्या प्रतिबंधात्मक कारवाई केली. यावेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ६० वाहनांवर कारवाई करत तब्बल ६६ हजार ५०० रूपय़ांचा दंडही वसुल करण्यात आला आहे. मुजावर कॉलनी, सुर्यवंशी मळा व कार्वे नाका परिसरात कोम्बीग ऑपरेशन राबविले.

त्यात पोलिसांनी वाहन तपासणी, पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांना शोधून त्यांची व घराची झडती घेत चौकशी केली. वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार ६० वाहनांवर कारवाई करत तब्बल ६६ हजार ५०० रूपय़ांचा दंडही वसुल करण्यात आला आहे.

मुजावर कॉलनी येथील पाण्याचे टाकीजवळ अचानक पणे राबविण्यात आलेल्या कॉबींग ऑपरेशन मध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सुनिल विजय गवळीला (रा. घरकुल वसाहत मुजावर कॉलनी) धारदार कोयत्यासह ताब्यात घेतले. त्यावेळी तेथे दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध गुटख्याची कारवाई झाली.

त्यात मुश्ताक हमीद मुल्ला याच्या (वय 50 रा. मुजावर कॉलनी) घरामागे तब्बल 20 हजरांचा विमल गुटखा सापडला. तो पोलिसांनी जप्त करून त्याच्यावर कारवाई केली आहे. मुजावर कॉलनी येथे असिफ नबिलाल मोमीन (वय 46) याच्याकडे दोन सिलेंडर टाक्या व गॅस भरण्याकरीता वापरण्यात येणारी मोटर व रिक्षा असा एकुण ७५ हजारांचा पोलिसांनी जप्त करून त्याच्यावर कारवाई केली आहे.

दै. सकाळने कालच्या अंकात कार्वे नाका होतोय हॉटस्पॉट मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पोलिसांनी काल रात्री उसिरा कारवाई केली. कार्वे नाका परिसरातील मुजावर कॉलनी, सुर्यवंशीमळा व कार्येनाका पोलिसांनी काल रात्री उशिरा कोम्बीग ऑपरेशन राबवले.

त्यात पोलिस उपाधीक्षक यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, डीबी पथक, शहर व तालुका पोलिस ठाण्यातील ५० कर्मचारी, वाहतुक शाखेचे २२ कर्माचारी कोबींग ऑपरेशनमध्ये सहभागीस झाले होते. त्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सुचना केल्या होत्या.

त्यानुसार त्या भागात कोम्बीग ऑपरेशन राबविण्यात आले. मुजावर कॉलनी, सुर्यवंशीमळा व कार्वे नाका परिसरात वाढते गुन्ह्याचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांचे पहिले पाऊल होते. कारवाईमुळे मुजावर कॉलनी, सुर्यवंशीमळा व कार्वेनाका मधील सराईत गुन्हेगारांवर जरब बसली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

शहरातील कार्वे नाका परिसरत मोठ्या प्रमाणात गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. त्यावर अंकुश रहावा, यासाठी त्या परिसरात कोम्बीग ऑपरेशन राबवले. आहे. अशाच प्रकराच्या शहरातील अन्य भागातही कोम्बींग आपरेशन राबविले जाणार आहेत. गुन्हेगारी विषयी काहीही माहिती मिळाल्यास नागरीकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

- अमोल ठाकूर, पोलिस उपाधीक्षक, कऱ्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.