कोविडसाठी गब्बर नगरसेवकांचे 800 रुपये कसे? नगराध्यक्षांचा पलटवार

मानधन परस्पर कोविडला वर्ग करण्याचा विरोधकांचा डाव
Mayor Rohini Shinde
Mayor Rohini Shindeesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : कोविडसाठी (Coronavirus) पालिकेच्या (Karad Municipality) जनरल फंडात बैठकीचे भत्ते जमा करण्यावरून माझ्यावर आरोप होत आहेत. मात्र, ज्या नगरसेवकांचे करोडोंचे व्यवसाय, मालमत्ता आहे. ज्यांचे टोलनाक्याचे ठेके आहेत, राजकारणाचा व्यवसाय म्हणून उपयोग करतात. त्या गब्बर नगरसेवकांचे ८०० रुपये कोविडला मदत म्हणून जमा करायचे. माझ्यासारख्या सामान्य घरातून आलेल्या महिलेकडून ८०० रुपयांसह मानधनाचेही दोन लाख ४० हजार जमा करण्यासाठी आरोप करायचे हा कुठला न्याय आहे, असा पलटवार नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांना आज केला.

Summary

जनशक्ती व लोकशाही आघाडी मिळून माझ्यावर टीका करीत असल्याचा आरोप नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केला.

त्या म्हणाल्या, ‘‘पालिकेत मानधनाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. ज्यांची पात्रता कऱ्हाडला माहिती आहे, अशी एक महिला नगरसेविका आपण महिला आहोत हे विसरून उचलली जीभ लावली टाळ्याला नुसार खालच्या भाषेत माझ्यावर टीका करत आहेत. तसे करून त्या प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. जनशक्ती व लोकशाही आघाडी मिळून टीका करीत आहेत. मात्र, साडेचार वर्ष तुम्ही निद्रिस्त होता काय? लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून २०१६ मध्ये निवडून आले. त्या वेळी पहिले तीन वर्ष दोन हजार ५०० प्रतिमहिना मानधन होते. २०१९ मध्ये शासनाने लोकनियुक्त नगराध्यक्षांना प्रतिमहिना २० हजार मानधन जाहीर केल्याने ते मिळू लागले. सामान्य घरातून आल्याने ती रक्कम मला मोठी व मोलाची आहे. कोविड कालावधीतील बैठकीत जनशक्तीने उपसूचना मांडली. त्यात नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवकांचे बैठकीचे भत्ते जमा करण्याचा ठराव झाला. त्यात त्यांनी उपाध्यक्ष, त्यांच्या गटाच्या नगरसेवकांशी चर्चा केली, असे त्यांचे म्हणणे आहे.

Mayor Rohini Shinde
'महाविकास आघाडी'त अडचण; NCP च्या आमदाराची BJP च्या आमदाराला 'ऑफर'

माझ्याशी कोणतीच चर्चा न करता त्यांनी परस्पर मानधनाचा विषय त्या उपसूचनेमध्ये समाविष्ट केला. मात्र, ठरल्याप्रमाणे अन्य सदस्यांसह माझाही बैठकीचा भत्ता शासनाकडे जमा आहे. वास्तविक मानधन वैयक्तिक हक्क असतानाही विचारत न घेता परस्पर मुद्दे घालून उपसूचना मांडायची, योग्य नाही. नगराध्यक्षांच्या अधिकारांचे हनन करण्याचा विरोधकांचा डाव आहे.’’ ज्या नगरसेवकांचे करोडोंचे व्यवसाय, मालमत्ता आहे, ज्यांचे टोलनाके आहेत. राजकारणाचा उपयोग व्यवसाय म्हणून करतात. त्या गब्बर नगरसेवकांनी केवळ ८०० रुपये कोविडला मदत दिली, तर माझ्यासारख्या सामान्य कष्टकरी घरातून आलेल्या महिलेकडून ८०० रुपयांसह मानधनाचेही दोन लाख ४० हजार जमा करा म्हणणे म्हणजे माझा हक्क ओरबाडून घेण्याचा प्रकार आहे, असे त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()