Karad RTO : अपघाताच्या पार्श्वभूमीवर RTO ची 34 खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई; 'इतक्या' लाखांचा ठोठावला दंड

अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आली.
Karad RTO
Karad RTOesakal
Updated on
Summary

आराम बसना सुमारे तीन लाखांवर दंड आरटीओच्या वायुवेग पथकाने ठोठावला आहे.

कऱ्हाड : येथील आरटीओ कार्यालयाकडून (RTO Office) खासगी प्रवासी बस (Private Bus) अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आली. त्याअंतर्गत ७० खासगी बसची तपासणी करण्यात आली.

Karad RTO
Mumbai Rain Update : पुढील दोन दिवस मुंबईकरांसाठी महत्वाचे; हवामान विभागानं दिला मुसळधार पावसाचा इशारा

तर, ३४ खासगी बसवर कारवाई करण्यात आली. संबंधित आराम बसना सुमारे तीन लाखांवर दंड आरटीओच्या वायुवेग पथकाने ठोठावला आहे. येथील आरटीओ कार्यालयाकडून खासगी प्रवासी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आली.

ही मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वायुवेग पथकातील मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, सुनील राजमाने, शिरीष पोकळे, सहायक मोटर वाहन निरीक्षक महेश पाटील, श्रीमती एरंडे यांनी राबवली. त्याअंतर्गत स्पीड गव्हर्नरमध्ये छेडछाड करणे, कागदपत्रे वैध नसणे, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसणे, ती मुदतबाह्य असणे.

Karad RTO
Rain Update : धो धो पाऊस पडताच लाईटीची सुरु झाली बोंबाबोंब; 'हेस्कॉम'कडं 100 हून अधिक तक्रारी

तसेच लेन कटिंग, आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत नसणे, परवाना, अटींचा भंग, अवैध टप्पा वाहतूक, बसच्या टपावरून माल वाहतूक आदी प्रकारची तपासणी करून ३४ खासगी बसवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनांना सुमारे तीन लाखांवर दंड ठोठावण्यात आला आहे.

Karad RTO
Kirit Somaiya विरोधात काँग्रेस आक्रमक; सोमय्यांची प्रतिमा पायदळी तुडवत महिलांनी मारले जोडे

या वेळी परिवहन विभागाकडून चालकांचे प्रबोधन करण्यात आले. चुकीच्या ठिकाणी वाहन पार्किंग करू नये, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवणे, प्रथमोपचार पेटी ठेवणे, उतारावर वाहने न्यूट्रल करून चालवू नये, लांब पल्याच्या प्रवासात वाहनचालकाने दोन- तीन तासांची विश्रांती घ्यावी.

Karad RTO
मंदिरांत प्रवेश करण्यापूर्वी 'ही' काळजी घ्या, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान; धर्मादाय खात्यानं दिलाय महत्वाचा आदेश

तसेच वेग मर्यादेचे पालन करावे, चालकाची आरोग्य तपासणी नियमीत करावी आदी सूचना देण्यात आल्या. प्रवाशांनी बसमध्ये बसताना आपत्कालीन दरवाजाचे ठिकाण, प्रवासातील आवश्यक बाबींची काळजी घेण्यासंदर्भात प्रवाशांचे प्रबोधन करण्यात आले. ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.