कराड अर्बन बँकेने गाठला 4500 कोटीपर्यंतचा व्यावसायिक टप्पा

कराड अर्बन बँकेने गाठला 4500 कोटीपर्यंतचा व्यावसायिक टप्पा
Updated on
Summary

डॉ. एरम म्हणाले, क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्कला सामोरे जात बँकेने वेगळेपण जपले.

कऱ्हाड (सातारा) : गुणात्मकता आणि निश्चीत कार्यपद्धतीच्या सुत्रामुळे कराड अर्बन बँकेने चार हजार 500 कोटीपर्यंतचा व्यवसायिक टप्पा गाठला आहे. 35 वर्षापासून संचालक मंडळाने दिलेले योगदान, बँकेच्या व्यवसाय वाढीला मिळालेली चालना यामुळे बँकेचा भविष्य काळ उज्वल आहे, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी व्यक्त केला. बँकेची वार्षिक सभा ऑनलाईन झाली. त्यावेळी ते बोलत होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, संचालक उपस्थित होते.

कराड अर्बन बँकेने गाठला 4500 कोटीपर्यंतचा व्यावसायिक टप्पा
कऱ्हाड पुन्हा हादरलं! महिनाभरात तब्बल नऊ जणांचा खून

डॉ. एरम म्हणाले, क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्कला सामोरे जात बँकेने वेगळेपण जपले. रिझर्व्ह बँकेने त्यासाठी अंतर्गत लेखापरिक्षण बंधनकारक आहे. मार्च 2022 पूर्वी लेखापरिक्षण कार्यपद्धती सुरू करण्याच्या सूचना आहेत. बँकेने नियोजन केले आहे. अद्ययावत सॉफ्टवेअरमुळे निर्धारित वेळेपूर्वी त्याची अंमलबजावणी होणार आहे. मार्च-2021 अखेर अग्रक्रम क्षेत्राला 43.69 टक्के कर्ज पुरवठा केला आहे. मार्च 2022 अखेर 50 टक्के उद्दीष्ठ आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी अर्थपुरवठ्याचे प्रमाण 5.87 टक्के आहे. 2021-22 मध्ये 11 टक्क्यापर्यंत वाढविणे गरजेचे आहे. बँकेच्या कर्जव्यवहारापैकी 50 टक्के कर्जे प्रती कर्जदार 25 लाख किंवा टायर एक कॅपिटलच्या 0.20 टक्के यापैकी कमाल रकमेच्या मर्यादित असणे आवश्यक आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने मार्च 2024 अखेरची मर्यादा दिली आहे.

कराड अर्बन बँकेने गाठला 4500 कोटीपर्यंतचा व्यावसायिक टप्पा
कऱ्हाड-पुणे थेट एसटी बससेवा

बँकेच्या मार्च 2021 च्या स्थितीचा विचार करत अशा छोट्या कर्जांचे प्रमाण 28.47 टक्के इतके आहे. मार्च-2022 अखेर त्यात 32.74 टक्क्यापर्यंत वाढीचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी कालबद्ध नियोजन केले आहे. यावर्षाची आर्थिक पत्रके रिझर्व्ह बँकेच्या नव्या परिपत्रकीय सूचनांनुसार आहेत. मार्च 2021 अखेर बँकेचा व्यवसाय चार हजार 451 कोटी आहे. बँकेला 58 कोटींचा ढोबळ नफा तर आयकर व तरतुदी वजा जाता वीस कोटी 12 लाखांचा नफा झाला आहे. बँकेच्या 25 शाखांना रूपये एक कोटीपेक्षा जास्त नफा झाला आहे. भाग भांडवलामध्ये 53 लाख 48 हजारांची वाढ झाली आहे. चालू वर्षांत भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) बँकेने 16.14 टक्के इतके राखले आहे.

कराड अर्बन बँकेने गाठला 4500 कोटीपर्यंतचा व्यावसायिक टप्पा
कऱ्हाड : सुट्टीवर असतानाही हवालदाराने कर्तव्य बजावल्याने चोरटे गजाआड

मुख्य कार्यकारी अधिकारी गुरव यांनी नोटीस वाचली. संचालकांनी ठराव वाचले. सभेच्या शेवटी अर्बन कुटुंब प्रमुख जोशी यांनी सभासदांनी विचारलेल्या ऑनलाईन प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. सरकारने बँकांना वसुलीसाठी नादारीसहीत दिवाळखोरी कायद्याचे कवच दिले होते. त्याचा बँकेने प्रभावी वापर करत सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊन थकीत रकमेची वसुली केली. सभासदांना लाभांश देण्यासाठी बँकेने अपेक्षीत नफा क्षमता गाठली आहे. रिझर्व्ह बँकच्या धोरणांनुसार, बँक यावर्षी सभासदांना 5 टक्के लाभांश देत आहोत, असेही श्री. जोशी यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.