Karhad News: छत्रपती शिवाजी स्टेडीयमचे रुपडे पालटणार; 96 कोटींचा निधी मंजूर

Atul Bhosle: नुतनीकरणामुळे स्टेडीयमचे रुपडे पालटणार असुन खेळाडुंचीही चांगली सोय होणार आहे.
छत्रपती शिवाजी स्टेडीयमचे रुपडे पालटणार;  96 कोटींचा निधी मंजूर
Karhad Newssakal
Updated on

Satara News: येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमच्या नुतनीकरणासाठी राज्य सरकारकडुन 96 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. नुतनीकरणामुळे स्टेडीयमचे रुपडे पालटणार असुन खेळाडुंचीही चांगली सोय होणार आहे.

कऱ्हाडला खेळाडुंच्या सोयीसाठी पालिकेकडुन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्यमातुन खेळाडुंची सरावासाठी चांगली सोय झाली आहे. त्याचबरोबर येथील स्टेडीयमवर अनेक वर्षापुर्वी रणजीचे सामनेही झाले होते.

त्यानंतर मात्र त्या स्टेडीयमकडे दुर्लक्ष झाल्याने त्याच्या नुतनीकरणाची आवश्यकता होती. त्यासाठी मध्यंतरी कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर अतुल भोसले यांनी त्यांच्याकडे स्टेडीयमच्या नुतनीकरणासाठी निधीची मागणी केली होती.

त्याची दखल घेवुन राज्य सरकारने आऱाखडा सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार पालिकेकडुन संबंधित स्टेडीयमच्या नुतनीकरणासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या नुतनीकरणाच्या निधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने अतुल भोसले यांना पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेवुन राज्य सरकारकडुन स्टेडीयमच्या नुतनीकरणासाठी 96 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले यांनी सांगीतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com